लक्षवेधी
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चिमूर शहरातील मानीक नगरमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती चिमूर पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना तेथील स्थानिक नागरिकांनी दिनांक १ एप्रिल २०२६ रोज बुधवारला सायंकाळी ८ ते ९ वाजताच्या दरम्यान दिली.
माहिती देताच,चिमूर पोलीसांनी वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणी धाड टाकली आणि रात्रो ९ ते साडेनऊ वाजताच्या दरम्यान ३ युवतींना ताब्यात घेतले असल्याची माहिती स्थानिक लोकचर्चेतून प्राप्त झाली.
याचबरोबर स्थानिक नागरिकांनी आमदार किर्तीकुमार भांगडिया यांना काॅल करुन मानीक नगरसह चिमूर शहरातील वेश्याव्यवसाय बंद करण्याची मागणी केली.सदर मागणीला अनुसरून आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी चिमूर शहरातील वेश्याव्यवसाय बंद करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहितीही स्थानिक लोकचर्चेतून पुढे आली.
मात्र,चिमूर पोलीसांनी पकडून नेलेल्या ३ युवतींचे काय केले?,त्यांच्यावर कारवाई केली काय?,”की,कारवाई न करताच त्या ३ युवतींना सोडून दिले?,त्या युवती कुठल्या आहेत?,त्या का म्हणून चिमूर येथील मानीक नगरमध्ये राहायला आल्यात?,त्या वेश्याव्यवसाय करीत होत्या तर कुणाच्या छत्रछायेखाली? वेश्याव्यवसाया मागील कारणे काय? आणि त्यांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी कुणी भाग पाडले,याचा थांगपत्ता मानीक नगर येथील नागरिकांना नसल्याने चिमूर शहरात त्या ३ युवतींच्या बाबत खमंग चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे.
चिमूर शहरात ठिकठिकाणी वेश्याव्यवसाय सुरु असून स्थानिक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
चिमूर शहरासह तालुक्यात अवैध व्यवसायाला मोठे पाठबळ मिळत असल्याने,अवैध व्यवसायाचे खरे सुत्रधार कोण आहेत याचा शोध चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी घ्यायला पाहिजे,या मताची चिमूर तालुक्यातील जनता आहे.
वेश्याव्यवसायासह सर्व अवैध व्यवसायाचे सुत्रधार कोणीही असोत,आणि कुठल्याही पक्षासी निगडीत असोत,ते व्यक्ती कुठल्याही पदावर असो,त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे काम पोलिस विभागाचे आहे.
चिमूर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु असलेले अवैध धंदे,हे सांगून जातात की,यामागचा खरा सुत्रधार मोठा व्यक्ती आहे.या व्यक्तीला चिमूर तालुक्यातील पोलिस अधिकारी व महसूल अधिकारी सुध्दा घाबरत असल्याचे दिसून येत आहे.
चिमूर तालुक्याला अवैध धंद्याच्या गर्तेत ओढणारा व्यक्ती हा कितीही मोठा असला तरी त्या व्यक्तीला चिमूर तालुक्यातील नागरिकांच्या समोर आणणे हे पोलिसांचे काम आहे.
याशिवाय चिमूर तालुक्यातील अवैध धंदे बंद होणार नाही,अशी शंका आहे.मात्र,चिमूर शहरात सुरू असलेला वेश्याव्यवसाय खतरनाक रुप धारण करणारा असल्याने चिमूर शहरातील नागरिक पेटून उठले तर याला जबाबदार स्थानिक प्रशासन असेल एवढे पक्के!…



