Home देशविदेश आम्ही जगाचे लोक………… — हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित...

आम्ही जगाचे लोक………… — हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान स्वतःप्रत अधिनियमित आणि अंगीकृत करून हे अणूयुद्ध कायमचे टाळण्यासाठी आम्ही प्रतिज्ञा करत आहोत…. — भाग =01

आम्ही युद्धक्रांती नव्हे बुद्धशांती निर्माण करू…

     “जगातला प्रत्येक नागरिक कोणत्या ना कोणत्या धर्माचा अनुयायी आहे. कोणताही धर्म हिंसा शिकवत नाही. प्रत्येक धर्माच्या तत्वज्ञानात मानवताधर्माची बीजे असतातच, तर मग जगात नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणाने वाईटच घडून रक्त सांडतच का राहते………?  

          या प्रश्नाचे उत्तर शोधले असता एक प्रकर्षाने जाणवले की या धर्मसंस्थापकांनी आपापल्या धर्मात मानवताधर्माचीच बीजे पेरली होती. परंतू नंतरच्या काळात त्यांच्याच धर्मोपदेशकांनी स्वतःच्या अहंकारापोटी त्या त्या धर्माना कलंकित करण्याचे काम केले म्हणून प्रत्येक धर्माची दोन दोन शकले पडली. त्यातूनच पुढे मानवताधर्माची बीजे नष्ट होऊन अहंकारातूनच मानवामानवात गटबाजी निर्माण होऊन आजचे असे जग निर्माण झाले. 

      या सर्वांना कारणीभूत जर कोण असेल तर ती म्हणजे केवळ आणि केवळ मानवताविरोधी शक्ती…….

     जीला आज आम्ही……

     साम, दाम, दंड आणि भेदावर आधारलेली RSS ची कुटनीती, जीला मनुस्मृतीने, बामणीकाव्याने निर्माण केले…..!

         म्हणून आमच्यापुढे सर्वात मोठे आव्हान आहे की या निसर्गनियमाविरुद्ध, मानवतावादाविरुद्ध असलेल्या जागतिक मनुवादी कुसांस्कृतिक शक्तीला या विश्वातून कायमचे या संविधान जागृतीच्या कृतीच्या अविष्कारितेतून कायमचे घालवल्याशिवाय राहणार नाही. ज्या या जागतिक शक्तीने आमच्यावर अणू युद्धाची टांगती तलवार निर्माण केली……!

   आज नाही तर कधीच नाही…..

 म्हणूनच ही जागृतीची मालिका निरंतर चालणारी आहे.

   कारण आम्हाला जागतिक अणूयुद्ध क्रांती नको केवळ आणि केवळ बुद्धशांतीच हवी…..

   टीप :- प्रत्येकांना सूचनावजा विनंती आहे की या मालिकेतील सर्व भाग आपल्याला मराठी भाषेसोबतच इतर कोणतीही भाषा चांगली अवगत असेल तर त्या त्या भाषेत अनुवाद करून प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मदत करावी. या जागतिक शांततेचा धोका टाळण्यासाठी…… 

         आव्हानकर्ता 

        अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689