Home Social मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास : शंकरपूर ग्रामस्थ हैराण,तात्काळ कारवाईची मागणी…

मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास : शंकरपूर ग्रामस्थ हैराण,तात्काळ कारवाईची मागणी…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

       मौजा शंकरपूर (ता. चिमूर, जि.चंद्रपूर) येथे मोकाट कुत्र्यांचा हौदोस व त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांत गावातील अनेक नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.

        विशेषतः लहान मुले,वृद्ध व्यक्ती आणि सकाळ-संध्याकाळ फिरणारे नागरिक यांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे.

        या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून,प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

      शंकरपूर येथील नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की,जर लवकरात लवकर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला नाही,तर ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.

गावकऱ्यांच्या मुख्य मागण्या…‌

— गावातील मोकाट कुत्र्यांना तात्काळ पकडून सुरक्षित ठिकाणी हलवावे.
— जखमी नागरिकांना त्वरित वैद्यकीय मदत व लसीकरण सुविधा उपलब्ध करून द्यावी.
— ग्रामपंचायत व संबंधित विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.

           शंकरपूर ग्रामस्थ प्रशासनाकडून तातडीने सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त करीत आहेत हे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे.