रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
श्रीक्षेत्र हनुमान मंदिर देवस्थान,खडसंगी येथील मंदिर जीर्णोद्धार समिती- २०२६ च्या वतीने आयोजित प्रभू श्रीराम मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण व श्रद्धामय वातावरणात संपन्न झाला.
प्रभू श्रीराम म्हणजे मर्यादा, सत्य आणि धर्माचे साक्षात प्रतीक. त्यांचे जीवन हेच आपल्यासाठी आदर्श मार्गदर्शन आहे. जिथे राम आहेत, तिथे हनुमान आहेत आणि जिथे हनुमान आहेत, तिथे अजिंक्य शक्ती,अचल भक्ती आणि निस्सीम सेवाभाव आहे. श्री हनुमंताचे मंदिर म्हणजे केवळ देवस्थान नव्हे, तर संकटनाशक शक्तीचे आणि रामभक्तीचे जिवंत केंद्र आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. बंटीभाऊ भांगडीया व सुविद्य पत्नी सौ. अपर्णाताई भांगडीया यांनी या पावन सोहळ्यात सहभागी होऊन प्रभू श्रीरामांची विधिवत पूजा-अर्चना करून परिसरातील समस्त जनतेसाठी सर्वमांगल्याची मनोकामना केली.
दरम्यान श्रद्धा,भक्ती आणि संस्कृतीच्या जपणुकीतूनच समाज एकसंध आणि बलशाली होतो. धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार म्हणजे केवळ दगड-विटांची उभारणी नव्हे, तर पिढ्यान्पिढ्या जपलेल्या आस्थेचे पुनरुज्जीवन आहे. प्रभू श्रीरामांचे आणि श्री हनुमंताचे आशीर्वाद चिमुर विधानसभा क्षेत्रातील परिवाराच्या प्रत्येक घरावर सदैव राहोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
या पावन सोहळ्यास माजी आमदार तथा माजी अध्यक्ष खनिकर्म महामंडळ श्री. अविनाशजी वारजुकर, राजु देवतळे, घनश्याम डुकरे,संजय नवघडे, गजानन गुळधे, मनिष तुमपल्लीवार,समीर राचलवार,बंटी बनकर,कमल असावा,विनायक औतकर, अरुण नागोसे,नाना मेश्राम,प्रमोद श्रीरामे, रवी कोलते,संदीप भोस्कर,बंडू बारेकर,हर्षल डुकरे,हरी कामडी,मनी राय यांच्यासह रामभक्त,तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नेतेमंडळी, निष्ठावान कार्यकर्ते तसेच असंख्य भाविक भक्त मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.



