शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
सम्राट अशोकांचे मूळ पुरुष हे जन्माने बौद्ध होते.त्यामुळे सम्राट अशोक हा जन्मत:च बौद्ध राजा होता,पण इथल्या इतिहासकारांनी खोटी माहिती सांगून कलिंग युद्धा नंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला असं सांगण्यात आलं.
परंतु तत्कालीन इतिहासकाराने सम्राट अशोकांना क्रूर राजकर्ता ठरवले.मात्र इंग्रज संशोधकांनी सम्राट अशोक यांच्या शिलालेखांचा अभ्यास करून सम्राट अशोक असे समाजाभिमुख राजे होते,त्यांनी लोक कल्याणाच्या योजना राबवित आपल्या धर्माबरोबर इतर धर्माचा आपण आदर केला पाहिजे अशी भावना सम्राट अशोक यांची होती.याबाबत इंग्रज संशोधकांनी शिलालेखाच्या माध्यमातून समोर आणले असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत हरी मेश्राम सर यांनी केले.
महाबोधी महाविहार समन्वय समिती तालुका चिमूर व समता सैनिक दल तालुका चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येथे अखंड भारताचे निर्माता सम्राट अशोक जयंती कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाबोधी महाविहार समन्वय समिती चिमूर तालुकाध्यक्ष विलास राऊत होते तर प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी विचारवंत हरी मेश्राम,सामाजिक कार्यकर्ते डॉ.आशिष पाटील,डॉ.महेश खानेकर सर,आयु. सुरक्षाताई अंबादे धम्मांजली महिला मंडळ अध्यक्ष,तक्षशिला बुद्धविहाराचे अध्यक्ष वतन सहारे,धम्मपाल नरवडे एसबीआय चिमूर शाखा व्यवस्थापक आदी उपस्थित होते.
चिमूर शहरांमध्ये दुसऱ्यांदा चक्रवती सम्राट अशोक यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता रमाबाई भीमरावजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
प्रथम क्रमांक ₹१००० मार्शल निशा प्रकाशनाथ पाटील,द्वितीय क्रमांक ₹ ७००,मार्शल शाश्वत रूपचंद पाटील,तृतीय क्रमांक ₹ ५०० मार्शल द्रृष्टी विलास राऊत यांना देण्यात आले.
याचबरोबर सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन प्रमाणपत्र वितरण (रोख रक्कम, प्रशस्तीपत्र,शिल्ड,भारत राष्ट्र कॅलेंडर) करण्यात आले.
हरी मेश्राम पुढे म्हणाले की ज्या सम्राट अशोकांनी बंगाल पासून अफगाणिस्तान पर्यंत राज्य विस्तार केला त्याच सम्राट अशोकाला आज शासन विसरल्याचे दिसून येत आहे.सम्राट अशोकाच्या राज्यकारभाराच्या अनेक बाबीचा भारत देशाने स्वीकार केला.
त्यांनी कोरलेले अशोक चक्र भारत देशांनी आपल्या ध्वजावर स्वीकारले,चार सिंहाची प्रतिमा सारनाथच्या स्तुपावरून सरकारने स्वीकारली.एवढे सारे असताना आज मात्र सम्राट अशोकांना देश विसरला त्यांचे कर्तृत्व देश विसरून गेला,याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.
याप्रसंगी विलास राऊत,डॉ.आशिष पाटील,डॉ.महेश खानेकर,आयुष्यमती सुरक्षा अंबादे,धम्मपाल नरवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रकाश मेश्राम यांनी केले तर प्रास्ताविक महेंद्र बारसागडे यांनी केले.आभार प्रियानंद गेडाम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्मांजली महिला मंडळ,महाबोधी महाविहार समन्वय समिती तालुका चिमूर,समता सैनिक दल चिमूर यांनी सहकार्य केले.



