Home Social तरुणींना प्रोत्साहन व प्रेरणादायी ठरलेला सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप – नगरसेविका नलिनी...

तरुणींना प्रोत्साहन व प्रेरणादायी ठरलेला सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप – नगरसेविका नलिनी आडपवार… 

शुभम गजभिये

 विशेष प्रतिनिधी

    समाजातील महिला व तरुणींसाठी सहज सुचलं हा व्हाॅट्सअप गृप प्रोत्साहन व प्रेरणादायी ठरलेला आहे असे मत मूल नगरपरिषदेच्या नगरसेविका नलिनी आडपवार यांनी व्यक्त केले.

      त्या आज एका कार्यक्रमात झालेल्या भेटी दरम्यान या प्रतिनिधीशी बोलत होत्या.

गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी मूल नगरीत जनहित व्दाराआयोजित एका भव्य महिला सन्मान पुरस्कार समारंभात माझी सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक यांच्याशी भेट झाली,त्याच दिवशी मी सहज सुचलंची एक सदस्य झाली.

        माझं कार्य बघता मला या गृपचे सहसंयोजिका पद,मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे व अधिवक्ता धोटे यांनी बहाल केल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

       माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी आजही प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचा नगरसेविका नलिनी आडपवार शेवटी म्हणाल्या.