राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा तालुक्यातील पुराडा पोलीस स्टेशन अंतर्गत पुराडा,हेटी, वाघदरा, रामगड,जामटोला,कुंभीटोला,येडापुर परिसरात अवैध दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. यामुळे या भागातील अनेक तरुण घरचे कर्ता पुरुष दारूच्या व्यसनात व्यसनाधीन झाले असून अनेकांची तब्येतीवर परिणाम पडला आहे, दारूमुळे काही कर्ते पुरुष तर मृत्युमुखी पडले आहेत.
अनेकदा पुराडा पोलीस स्टेशनला निवेदन देऊनही काही दिवसांसाठी दारू विक्री बंद असते नंतर पुनश्च काही दारू विक्रेते मोठ्या प्रमाणात दारू विक्री करीत असतात या अवैध दारू विक्रीमुळे घरच्या महिलांना फार मोठा त्रास होत आहे.
घराघरात झगडे होत असून घरच्या महिलांना मारहाणीच्या प्रकारात वाढ होत आहे घरच्या कर्ता पुरुषाला व्यसन लागल्यामुळे अनेकांचा कुटुंबातील घरच्या लोकांना उपासमारीची पाळी सुद्धा आलेली आहे या अवैध दारू विक्रीच्या त्रासाला कंटाळून शेकडो महिलांनी युवती सेना जिल्हाध्यक्ष प्रा.कु.उमाताई चंदेल यांच्या नेतृत्वात पोलीस उपविभाग विभागीय कार्यालय येथे धडक देत निवेदन सादर केले.
याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्रजी भोसले हे पोलीस भरती करिता गडचिरोली येथे गेले असल्याने प्रतिनिधी म्हणून कुरखेडा पोलीस निरीक्षक श्री वाघ यांनी निवेदन स्वीकारले याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र भोसले यांच्याशी दूरध्वनीद्वारे चंदेल यांनी अवैध दारू विक्री संदर्भात चर्चा केल्याने अवैध दारू विक्री आम्ही तात्काळ बंद करू व दारू विक्रेत्यावर तात्काळ कार्यवाही करू असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी दिले.
जर अवैध दारूविक्रेत्यांवर कार्यवाही न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे हजारो महिलांचा मोर्चा नेण्यात येईल असा इशारा चंदेल यांनी दिला आहे.
याप्रसंगी कुरखेडा शहरप्रमुख अश्विनीताई पिंपळकर, महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष सोनी गंगाचौधरी, देवकी सोनवाणी, सलेंद्री सोनवणे, शेवंता सहाळा, लता दखणे, जास्वंदा उसेंडी , जिजाबाई होळी रसिका मडावी ,शालू दरवडे सह शेकडो महिला उपस्थित होत्या.



