युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
हा दिवस मराठी साहित्यातील महान कवी नाटककार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो.मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेची जाणीव करून देणे आणि तिच्या संवर्धनाचा संकल्प दृढ करणे हा या दिवसा मागिल मुख्य उद्देश आहे. महाविद्यालयाच्या मराठी विभागात विभागाद्वारे मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजक प्रा.अतुल चऱ्हाटे यांनी केले होते. त्याचप्रमाणे ग्रंथालय विभागाद्वारे महाविद्यालयामध्ये ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन तसेच निबंध स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.भारत कल्याणकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.प्रविण सदार उपस्थित होते.
ग्रंथ प्रदर्शनी व निबंध स्पर्धेसाठी महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा.विपिन लिल्लारे यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथ प्रदर्शनी संदर्भात मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथालय विभाग विविध उपक्रमाचे आयोजन करत असते.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा.सागर भुसारी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.अतुल चराटे यांनी केले. निबंध स्पर्धा व पुस्तकं प्रदर्शन मध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.



