शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता,शेतकरी,विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे,तसेच महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख,कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” आयोजित करण्याबाबत शासन निर्णय क्र.मराअ-2026/प्र.क्र.09/समन्वय-1 दिनांक 18.02.2026 अन्वये घेण्यात आला आहे.
सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे,महाराष्ट्र जमिन महसूल संहितेच्या नवीन तरतुदींची जनजागृती करणे / प्रभावी अंमलबजावणी करणे,डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे,नागरिकांना Single Day Service Delivery द्वारा सेवा पुरविणे,या उद्देशाने माहे मार्च ते माहे मे या कालावधीमध्ये राज्यात महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद / नगर पंचायत पातळीवर “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. १” राबविण्यात येणार आहे.
चिमुर तालुक्यामध्ये या अभियानाअंतर्गत खालील प्रमाणे शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
अ.क्र.,मंडळाचे नाव,शिबीराचा दिनांक…
1) शिबीराचे स्थळ :- नेरी,07/03/2026… राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामपंचायत सभागृह,नेरी..
२) आंबोली,14/03/2026,धुनीबाबा मंदीर सभागृह,आंबोली..
३) शंकरपुर :- 23/03/2026,संताजी जगनाडे महाराज सभागृह, शंकरपुर….
४) गोंदेडा :- 01/04/2026,गुरुदेव सेवा आश्रम,गोंदेडा…
५) जांभुळघाट :- 10/04/2026,आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा,जांभुळघाट…
६) मासळ :- 17/04/2026,राजीव गांधी विद्यालय,मासळ…
७) खडसंगी :- 30/04/2026,मानकादेवी सभागृह,खडसंगी…
८) भिसी :- 08/05/2026,नगर पंचायत कार्यालय,भिसी…
९) चिमुर/वडाळा पैकू :- 15/05/2026,तहसिल कार्यालय,चिमुर…
सदर शिबीरामध्ये प्रलंबीत फेरफार निकाली काढणे,7/12 मधील चुकांची दुरुस्ती करणे,डीजीटल स्वाक्षरीचे 7/12 आणि 8- अ चे उता-याचे वाटप,उत्पन्न,रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र वाटप,अकृषक तरतुदी बाबत मार्गदर्शन व नविन नियमानुसार सनद प्रक्रीयेची माहिती,सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभमंजुर करणे,तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबच्या प्रकरणांचा निपटारा,पांदन रस्त्याच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश,घरांसाठी पट्टे वाटप,ई-मोजणी अर्ज,अॅग्रीस्टेक, आणि पी.एम. किसान,भूसंपादन व कमी जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्यावत करणे,या सेवा पुरविण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा.क्र.1 अन्वये आयोजीत करण्यात आलेल्या शिबिरामध्ये नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.त्याच प्रमाणे चिमुर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,नगराध्यक्ष,नगर सेवक,सरपंच,ग्रामपंचायत सदस्य व इतर पदाधिकारी यांना शिबिरामध्ये उपस्थित राहण्याबाबत तहसिलदार चिमुर श्रिधर राजमाने यांचे तर्फे आवाहन करण्यात येत आहे.



