वृत्त विश्लेषण...
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
माजी आमदार डॉ.अवीनाश मनोहरराव वारजूकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सतीष मनोहरराव वारजूकर हे आपल्या चिरंजीवांसह काल भाजपमय झाले.
वारजूकर बंधू भाजपात गेले,यापेक्षा चिमूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची धूरा कुणाकडे दिली जाणार,याकडे तेथील लोकांच्या आता नजरा लागलेल्या आहेत.
आगीवर तेल ओतले गेले तर अग्निचा भडका होतोय आणि आगीवर पाणी टाकले तर आग बुजून जातोय.याचप्रमाणे राजकारणाचे गणीते आहेत.
म्हणजे चिमूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रिय काँग्रेस पक्षाचे कसे होणार,यापेक्षा डॉ.सतीष वारजूकर बंधू भाजपात गेल्यानंतर उलटपक्षी मजबूत होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना चिमूर मतदारसंघात राष्ट्रिय काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठीचे मैदान मोकळे पाहिजे होते,ते स्वत:हूनच झाले आहे!.याचा अर्थ असा की,ते आता या विधानसभा मतदारसंघात आपल्या रननितीची आखणी करणार आणि आपल्या पदाधिकाऱ्यांना जोमाने कामाला लावणार हे तेवढेच खरे आहे.
विजयभाऊच्या रननित्या आणि त्यातंर्गत गुपीतपते,हे निवडणूक पुर्व कधीच कुणाला कळत नाही.ते जे करतात ते काही दिवसात नियोजनबध्द पध्दतीने करतात,हा अनेकांचा प्रत्यक्ष अनुभव आहे.
परत त्यांच्यात पदाधिकारी,कार्यकर्ते,आणि लोकांना जवळ ठेवण्याची जी कार्यक्षमता आहे,ती वाख्यानाज्योगी आहे.विजयभाऊ मधील लोकसंवाद,लोकसहकार्य,पळवाट काढणारे नाही तर धिर देणारे,उभारी देणारे आहे.
तद्वतच विजयभाऊमधील लोकांच्या हितांची सर्वसमावेशक भावना,लोकांच्या प्रतीचा जिव्हाळा,अतिशय सखोल असल्याने ते कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही वेळेत बाजी मारणारे आहेत,हा त्यांचा राजकीय प्रवास!..
यामुळेच चिमूर मतदारसंघातील आयाबहिनी,विद्यार्थी,युवक-युवती,बेरोजगार,शेतकरी,हे त्यांच्या चिमूरमध्ये परत स्थिरावल्याने आनंदी होतील हे खरे राजकीय वास्तव आहे.
विजयभाऊंना चिमूर विधानसभा मतदारसंघात सर्वच ओळखतात,सर्वच मानतात,यामुळे ते परत या विधानसभा मतदारसंघात आपल्या राजकीय शक्तींचा दम दाखवू शकतात हे सत्य आहे…
लोकांप्रती विजयभाऊंचे खुले मन,आणि लोकांचे काम करण्याची सचोटी खूपच खमकी असल्याने ते सर्वांना हवेहवेसे वाटतात.
त्यांची कार्यपद्धत,”जात पाहून पिडा,तोंड पाहुन विडा,..नसल्याने ते अजूनही चिमूर विधानसभा मतदारसंघात लोकप्रिय आहेत…
याचबरोबर चिमूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची,कार्यकर्त्यांची फळी लाखोंच्या घरात असल्याने,त्यांच्यासाठी बाजी मारण्यास पूरेपूर फायद्याचे राजकीय सुत्र आहे.
चिमूर विधानसभा मतदारसंघातील लोक हे विजयभाऊ वडेट्टीवारांच्या सानिध्यात राहण्याला आवश्यक पसंती देतात,हेच त्यांचे प्रभावी माध्यम आहे.


