भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
दिनांक 24 फेब्रुवारी ला मुरूमगाव येथे मंडई मेला निमित्य बाजार करण्यास मुरूमगाव येथे आला होता.बाजार करून परत गावी जात असताना सदर घटना झाली.
ही घटना मुरूमगाव परिक्षेत्र पूर्व मुरूमगाव अंतर्गत ऊपक्षेत्र पूर्व मुरूमगाव नियतक्षेत्र केहकावाही कक्ष क्र. 677 मध्ये आज दि.25/2/2026 ला बुध्दुसिंग नोहरू ऊसेंडी वय 63 वर्ष यांना बिबट या वन्य प्राण्याने हल्ला करूण ठार केले.
वन विभागानी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी धानोरा येथे पाठविण्यात आले.



