Home Maharashtra कूरखेडा येथे बस आगार व थेट नागपूर बस सूरू करा :- आ.रामदास...

कूरखेडा येथे बस आगार व थेट नागपूर बस सूरू करा :- आ.रामदास मसराम…

     राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

 

 शहरात बस स्थानक व स्वतंत्र बस आगारा करीता जागा अधिग्रहीत करण्यात आली आहे मात्र फक्त बस स्थानकाचेच बांधकाम करण्यात आले आहे अधिग्रहीत करण्यात आलेली मोठी जागा अद्यापही रिक्त आहे. या जागेवर परिवहन महामंडळाने नविन बस आगाराचे बांधकाम करावे तसेच कूरखेडा व कोरची येथून थेट नागपूर ही बस फेरी सूरू करावी अशी मागणी जिल्हाधिकारी व संबंधित परिवहन महामंडळाचे अधिकारी यांचाशी झूम आनलाइन मिटींग मध्ये आमदार रामदास मसराम यांनी केली आहे.

              कूरखेडा येथे स्वतंत्र बस आगार नसल्याने गडचिरोली किंवा ब्रम्हपरी वरूनच या परीसरातील बस फेर्यां चे नियोजन करण्यात येते यावेळी कूरखेडा व कोरची या दूर्गम तालूक्यातील ग्रामीण भागात अद्यापही लालपरीचे दर्शन होऊ शकले नाही. त्यामूळे दूर्गम भागातील नागरीकाना तसेच विद्यार्थाना गंतव्य ठिकाण गाठण्याकरीता कठीन परीस्थीती चा सामना करावा लागतो येथे बस आगाराचे बांधकाम झाल्यास अंतिम घटका पर्यंत महामंडळाचा लालपरीची सेवा उपलब्ध करून देणे शक्य होणार तसेच या दोन्ही तालूका मूख्यालयातून राज्याची उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूर येथे थेट बस सेवा उपलब्ध नसल्याने येथील नागरीकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो त्यामूळे येथे बस आगार व थेट नागपूर बस फेरी सूरू करण्यात यावी या मागणीकडे मिटींग मध्ये आमदार रामदास मसराम यानी लक्ष वेधले.