रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या कुरघोडी राजकारणामुळे पक्षाचे मुरब्बी नेते,भाजपात प्रवेश करीत असल्याने जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचे दिसून येत आहे.
पुढील काही महिन्यात जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुका समोर असताना माजी आमदार अविनाश वारजूरकर, आणि जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सतीश वारजूरकर यांनी मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे चिमूर विधानसभेचे आमदार बंटी भांगडिया उपस्थित होते.या दोन्ही सख्ख्या भावाचे कट्टर विरोधक म्हणून डॉ. सतीष वारजूकर यांच्या विरोधात आमदार किर्तीकुमार भांगडिया हे विधानसभा निवडणूक लढले.आता त्यांच्याच पक्षात त्यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याने जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे हा पक्षप्रवेश होत असल्याची चर्चा असून, आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील संघर्षाचा फटका पक्षाला बसत आहे.या घडामोडींमुळे चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात तसेच येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसचे एकनिष्ठ,खंबीर व मुरब्बी राजकारणी म्हणून या दोन्ही वारजूकर भावांची चिमूर विधान मतदारसंघात ओळख आहे. यांच्या प्रवेशामुळे चिमूर मतदारसंघात क्षेत्रात काँग्रेसला चांगला फटका बसणार असून याचा भाजपला येणाऱ्या काळात फायदा होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत यातील प्रवेशाचे खरे गणित उघडकीस येणार काय? की अजून काही पक्ष प्रवेशामागे गुपीत दडलेले आहे हे समोर येणारच!…



