प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
भ्रष्ट्राचाराने बरबटलेले अधिकारी किंवा सत्ताधाऱ्यांचे मांडलिकत्व स्वीकारलेले अधिकारी,किंवा सत्ताधारी मंत्री,आमदार,खासदार,जसे सांगतील त्याप्रमाणे वागणारे गुलाम,लाचार भाडखाऊ तपास यंत्रणा या योग्य,निष्पक्ष,आवश्यक कर्तव्य पार पाडत नाही,यामुळे त्यांच्यावरुन लोकांचा विश्वास उडाला आहे,हे राजकीय पक्षांच्या खासदारांचे,नेत्यांचे प्रखरपणे मत आहे…
विरोधी पक्षनेते,विरोधी पक्षाचे खासदार,प्रवक्ता,जबाबदार संपादक हे अधिकाऱ्यांच्या बाबतीत आणि तपास यंत्रणांच्या बाबतीत कुणाचेही मांडलिकत्व स्वीकारू नका,तद्वतच भाडखाऊ,लाचार, गुलाम झाले आहेत,असे खडे बोल सुनावत असतील तर सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांची आणि तपास यंत्रणांची अयोग्य,कर्तव्यहिन,सुस्त,दिशभूल करणारी,अविश्वसनीय व खालच्या स्तरावरील कार्यपद्धत आहे हे आवर्जून लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांनी १ वर्षांपूर्वी चिमूर तालुकातंर्गत भिसी येथील नगरपंचायत सभागृहात घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सत्ताधारी आमदारांचे,” मांडलिकत्व,स्वीकारु नका,सर्व प्रकारचे निष्पक्ष काम करा,निष्पक्ष कर्तव्य पार पाडा असे खडेबोल सुनावले होते..
११ दिवसांपूर्वी शिवसेना उबाटाचे नेते,प्रवक्ता,दैनिक सामनाचे जबाबदार संपादक खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना स्पष्ट म्हटले होते,देशासह महाराष्ट्र राज्यातील तपास यंत्रणा,”भाडखाऊ,लाचार,गुलाम,झालेल्या आहेत,सत्ताधारी जसे म्हणतील तसेच ते काम करतात,त्यांच्यावरुन लोकांचा विश्वास उडाला आहे.यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्यातील पोलिस यंत्रणेचा सुध्दा उल्लेख केला होता.
दोन्ही जबाबदार खासदारांच्या गंभीर खडे बोलातून हे लक्षात येते की,महाराष्ट्र राज्यातील अधिकाऱ्यांनी आणि महाराष्ट्र राज्यातील तपास यंत्रणांनी, राज्यकर्त्यांच्या चुकीच्या व भ्रष्ट्र कार्यपध्दतीला सहकार्य करुन स्वत:ची पत घालवली आहे…
म्हणूनच आताच्या अधिकाऱ्यांत व तपास यंत्रणांमध्ये निष्पक्ष,निसंदेह,योग्य,आवश्यक कर्तव्य पार पाडण्याच्या उणीवा आहेत,लोक संरक्षणासाठी त्यांच्या कर्तव्यातद्वारे उमीद करता येते नाही…
तद्वतच चिमूर तालुक्यातील पोलिस अधिकारी व महसूल अधिकारी हे तालुक्यातील अवैध दारु विक्रींचे व सट्ट्यांची अड्डे,वाळू व मुरूमांचे अवैध धंदे,वेशाव्येवसाय बंद करु शकत नाही.यामुळे चिमूर तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांना व पोलिस अधिकाऱ्यांना भ्रष्ट्राचारी आहेत,सत्ताधारी आमदारांचे मांडलिकत्व स्वीकारलेले आहेत,ते सत्ताधाऱ्यांचे गुलाम झालेले आहेत असे म्हणावे काय?
चिमूर तालुक्यातील अवैध धंदे बंद होणार नाही असे गृहीत धरले तर याला जबाबदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार मानायचे काय?याचे उत्तर चिमूर तालुक्यातील सुस्त अधिकाऱ्यांनी दिले पाहिजे.
याचबरोबर चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांना चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी केव्हा वेळ मिळणार?
चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक हे जबाबदार अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडे विशेष अधिकार आहेत.यामुळे त्यांनीच चिमूर तालुक्यातील नागरिकांचे अवैध धंद्यांपासून संरक्षण करण्यासाठी आणि चिमूर तालुक्यातील अवैध धंदे मुळासकट बंद करण्यासाठी पदाची आवश्यक शक्ती पणाला लावली पाहिजे,या मताचे लोक आहेत…



