राजकीय घराणं म्हणून जे एक स्थान निर्माण केलंय ते आपल्या पाठीमागं लीलया पेलेल असा मुलगा नसला तरी मुलाच्या नात्यापेक्षा तसूभरही वेगळा नसणारा सख्खा पुतण्या असतो.
पण तोच पुतण्या अकाली सोडून जातो याच दुःख कस आणि किती लपवायचं?डोळ्यात येणारे अश्रू आणि गळ्यात साचणारा आवंढा कसा गिळायचा? आपण कायम तरुण आहोत हे सांगत राहील तरी थरथरणारे हात आणि बोलण्यातला थकवा लपून राहतो का?
कितीहीवेळा माझं काय वय झालं का म्हटलं तरी आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलासारखा पुतण्या जाणं हे दुःख वयाची 85 वर्ष गाठलेली असताना सहन होण्यासारखं असत का?
राजकीय परिघात भावनेला तसूभरही थारा नसतो,राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकीय सारीपाटावर आपण केंद्रस्थानी असाल तर भावनिकता आसपासही फिरकता काम नये इतकं कोरडेपण अंगी बाळगावं लागत…
तेव्हा पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेला पुतण्या गेल्याच दुःख सहन करण्याची घुसमट किती वेदनादायी असते हे अजितदादांच्या निधनांनंतर 15 दिवसांत दोनदा शरद पवारांना रुग्णालयात दाखल करावं लागत यावरून लक्षात येते.



