Home Social जेएसपीएम महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पदयात्रेचे आयोजन…

जेएसपीएम महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पदयात्रेचे आयोजन…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

          धानोरा, येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली व्दारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महाविद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आणि पदयात्रेचे आयोजन करण्यांत आले.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा ज्ञानेश बनसोड (राज्यशास्त्र विभाग प्रमुख) तर प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री प्रकाश कांबळे (निरीक्षक धर्मादाय आयुक्तालय, गडचिरोली) डॉ प्रियंका पठाडे (रासेयो कार्यक्रम अधिकारी) प्रामुख्याने यावेळी मंचावर उपस्थित होते.

          कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखविलेल्या शौर्य, सुशासन आणि राष्ट्रनिर्मितीच्या आदर्शांशी युवकांना जोडून जनजागृती करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या मुख्यद्वारा पासून धानोरा शहरात मोठ्या उत्साहात”पदयात्रेचे” आयोजन करण्यात आले.

          याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि कार्यावर प्रकाश टाकला.

           संचालन व प्रास्ताविक डॉ प्रियंका पठाडे यांनी केले तर आभार कु योगीता कोठवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री मनोज नन्नावरे श्री भास्कर वाढणकर श्री बालाजी राजगडे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या बहुसंख्य स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.