Home Social “आदिवासी संस्कृती जतनासह आधुनिकतेचा समन्वय आवश्यक” :- प्राचार्य डॉ.उदय थुल… 

“आदिवासी संस्कृती जतनासह आधुनिकतेचा समन्वय आवश्यक” :- प्राचार्य डॉ.उदय थुल… 

भाविकदास करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

               धानोरा, येथील महाविद्यालयात आदिवासी अध्यासन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली व्दारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान बिरसा मुंडा जयंतीवर्षानिमित्य जनजातीय गौरव व्याख्यानमाले अंतर्गत “ग्रामीण आदिवासी समाजापुढील आव्हाने” या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

             याप्रसंगी चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय थुल, प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाजसेवक श्री. बाजीराव नरोटे, प्राचार्य डॉ.रूपेन्द्र गौर सदस्य आदिवासी अध्यासन केंद्र गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ गणेश चुदरी मराठी विभाग प्रमुख ,आयोजक डॉ नितेश पुण्यप्रेड्डीवार विचारमंचावर उपस्थित होते. या चर्चासत्राचे औचित्य साधून प्राचार्य डॉ उदय थुल यांच्या शुभहस्ते मा बाजीराव नरोटे आणि डॉ रूपेन्द्र गौर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

               भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने चर्चासत्राची सुरुवात करण्यात आली.

          यावेळी उपस्थित प्रमुख वक्त्यांनी ग्रामीण आदिवासी समाजासमोरील शिक्षणाचा अभाव, आरोग्य सुविधा, बेरोजगारी, अंधश्रद्धा, वनहक्क प्रश्न, जल,जंगल आणि जमीन तसेच सांस्कृतिक जतनाची गरज या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आणि जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले.

            चर्चासत्रादरम्यान अध्यक्षीय मनोगतातून विविध प्रश्न उपस्थित करून विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृती जोपासतांना आधुनिकतेशी समन्वय साधण्याची आवश्यकता डॉ उदय थुल यांनी बोलून दाखवली तसेच अशा उपक्रमांमुळे सामाजिक जाणीव वाढीस लागते असे मत व्यक्त केले.

           सुत्रसंचालन प्रा मांतेश तोंडरे प्रास्ताविक डॉ नितेश पुण्यप्रेड्डीवार तर आभार प्रदर्शन डॉ सचिन धवनकर यांनी केले.

           चर्चासत्रास डॉ पंढरी वाघ, डॉ पंकज चव्हाण, डॉ दामोधर झाडे, प्रा ज्ञानेश बनसोड, डॉ प्रियंका पठाडे, डॉ प्रवीण गोहणे,प्रा प्रशांत वाळके यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने चर्चासत्र यशस्वीपणे संपन्न झाले.