लक्षवेधी
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
उपविभागीय अधिकारी,तहसीलदार आणि एसडिपिओ,ठाणेदार या पदाच्या अधिकारात चिमूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याचा दम आहे.
पण,या पदांचे व्यक्ती लोकहिताचे आणि खनिज संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी तत्पर नाही,याचे गुढ आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या अधिकारात दडलेले आहे असे दिसून येत आहे…
आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात,चिमूर तालुकातंर्गत अवैध धंदे वाढले असून,अवैध धंदेवाईक अनियंत्रित झाले आहेत.त्यांना महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांचे संरक्षण मिळत आहे असेच म्हणावे लागेल.
अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढणे आणि अवैध धंदेवाईक अनियंत्रित होणे,हा प्रकारच सत्तेच्या दालनातला, अधिकाऱ्यांवर असलेला धाक दिसतो आहे.
म्हणूनच अवैध धंदे वाढविण्याच्या व ते धंदे सुरू ठेवण्याच्या संसयाची सुई आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या अधिकाराकडे वळते आहे.
ज्या पक्ष पदाधिकाऱ्यांनी आमदार किर्तीकुमार भांगडिया यांना निवडून आणले,त्यांना अवैध धंद्याद्वारे रोजगार उपलब्ध करून दिला आहे,असे म्हणावे काय? या प्रश्नाचे उत्तर सुध्दा आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्याकडेच आहे.
चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने हे चांगल्या विचारांचे व चांगल्या मनाचे अधिकारी आहेत,तद्वतच ते सद्गृहस्थ आहेत.
चिमूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिनेश लबडे हे चिमूर वाशियांसाठी जुने अधिकारी आहेत.यामुळे त्यांची कार्यपद्धत चिमूरकरांनी चांगलीच अनुभवली आहे.
चिमूर तालुक्यातील भिसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार मंगेश भोंगाडे हे तसे नवीन आहेत.त्यांचा कार्यभाग कसा आहे हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना अजूनही माहिती नाही..
आता नवीन परिपत्रकानुसार आमदार व खासदारांचा अपमान होणार नाही असी कृती अधिकाऱ्यांना करावी लागते.त्यांच्या सुचनेनुसार कार्य करावे लागते.पण,अयोग्य भुमिका व अयोग्य कर्तव्या अंतर्गत नाही..
परंतु अवैध धंद्यामुळे चिमूर तालुक्यातील महिला-पुरुषांचा श्वास घुटमळत असतांना,आमदार किर्तीकुमार भांगडिया,तहसीलदार श्रिधर राजमाने,ठाणेदार दिनेश लबडे,ठाणेदार मंगेश भोंगाडे हे अवैध धंदे बंद करताना दिसत नाही.
यामुळे चिमूर तालुक्यातील,”अवैध धंदे बंद करण्याची जबाबदारी,”चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्यावर आली आहे,असे म्हणावे लागेल....



