शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील मौजा सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.यानंतर त्यांच्या जीवनकार्यावर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाप्रसंगी आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया,भाजप मंडळ अध्यक्ष मनिष तुमप्लीवार,एकनाथ थुटे,कुषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा भाजपाचे जेष्ठ नेते घनश्याम डुकरे,साताराचे माजी सरपंच तथा खडसंगी मासळ भाजप मंडळचे तालुकाध्यक्ष गजानन गुधळे,ग्रामपंचायत पदाधिकारी व शिव प्रेमी पदाधिकारी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच गजानन गुडधे यांच्यासह गावातील महिला पुरुषांनी अथक परिश्रम घेतले…
मार्गदर्शन करताना माजी सरपंच गजानन गुळधे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य,धैर्य,कुशल प्रशासन आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर स्वराज्य उभे केले.त्यांच्या कार्यामुळे भारतीय इतिहासात स्वातंत्र्य,स्वाभिमान आणि न्याय यांचे प्रतीक निर्माण झाले.आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श नेतृत्वाना प्रेरणास्थान मानले जातय.
आजच्या युवा पिढीने त्यांची प्रेरणा घ्यावीअसेही मत त्यांनी व्यक्त केले.



