प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
भाजपा व आर.एस.एस. हे सत्तेच्या बळावर,”भारत देशातील मुळ निवासी बहुजन नागरिकांच्या मुलभूत अधिकाराची पायमल्ली करीत आहे.
याचबरोबर भारत देशातंर्गत मुळ निवासी बहुजन समाजातील नागरिकांच्या अधिकाराप्रती व त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या अन्यायप्रती जागरुक करणाऱ्या भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यक्रमाला व अधिवेशनाला,”भाजपा प्रणीत राज्य सरकारे विरोध करुन,”कार्यक्रमाची व अधिवेशनाची परवानगी नाकारत आहेत.
हा भाजपाप्रणीत राज्य सरकारांचा हुकूमशाही प्रकार असून,”नागरिकांच्या मुलभूत अधिकारांना डावलणारा आहे.
कार्यक्रमाला व अधिवेशनाला परवानगी नाकारण्याची जडच आर.एस.एस.ची विचारधारा असून,”भारत देशातंर्गत मुळ निवासी बहुजन समाजा-विरोधातील त्यांची छुप्या एजंड्यातंर्गत रननिती आहे.
भारत देशातील ओबीसी,एससी,एसटी,अल्पसंख्याक आणि इतर बहुजन समाजातील नागरिक हे जागरुक होवू नये,,” त्यांना आपले अधिकार कळू नये,,” त्यांच्यावर छुप्या एजंड्यातंर्गत अन्याय-अत्याचार कोण करतय आणि त्यांचे शोषण कोण करतय हे त्यांना कळू नये,,” ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर विचारधारा व त्यासंबंधातील इतिहास त्यांना कळू नये,,” ते नेहमी मागे राहणारे असावेत,,” ते नेहमी मानसिक व शारीरिक गुलाम राहावेत,,” त्यांना स्वत:चा इतिहास कळू नये,,” त्यांच्यासाठी ज्या संतमहापुरुषांनी महान कार्य केले आहे त्या संतमहापुरुषांची ओळख त्यांना होवू नये व ते त्या संतमहापुरुषांच्या कार्याला स्विकारु नये,,” त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संघटनेत व राजकीय पक्षात ते जावू नये याची खबरदारी आर.एस.एस.व भाजपा त्यांच्या छुप्या एजंड्यातंर्गत घेतय.
म्हणूनच भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम आणि त्यांच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या २०० च्या वर संघटना,त्यातंर्गत लाखो पदाधिकारी,करोडो कार्यकता हे,मुळ निवासी बहुजन समाजा-विरोधातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा,आर.एस.एस.व भाजपाचा छुपा अजेंडा संपूर्ण भारतभर उघड करीत आहेत आणि बहुजन समाजातील महिला पुरुषांना,युवकयुवतींना,विद्यार्थीविद्यार्थीनींना,बेरोजगारांना,सातत्याने जागरुक करीत आहेत.
तद्वतच भाजपा राज्यातील सत्ताधारी हे भारत मुक्ती मोर्चा व त्यांच्या २०० च्या वर असलेल्या संघटनेच्या कार्यक्रमाला आणि अधिवेशनाला परवानगी जाणिवपूर्वक देत नाही.हा भाजपाचा,”बहुजन समाज विरोधातील प्रकारच भारत देशातील नागरिकांच्या मुलभूत अधिकाराची पायमल्ली करणारा आहे…
यामुळे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे,”महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या व बौध्दांचे जागतिक दर्जाचे दिक्षाभूमी हे पवित्र स्थळ असलेल्या नागपूर येथील आर.एस.एस.च्या कार्यालयावर,”मुळ निवासी बहुजन समाज घटकातील नागरिकांच्या मुलभूत अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोज रविवारला माहमोर्चा नेणार आहेत…
त्यांनी सार्वजनिक केले कि महाराष्ट्र पोलीस मला बेकायदेशीर अटक करणार असतील तर,भारत देशातील मुळ निवासी नागरिकांच्या मुलभूत अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी कारागृहात जायला ते तयार आहेत.
ते सविस्तर माहिती देताना म्हणाले की भारत देशात हिंदू नावाचा धर्मच नाही.ब्राम्हण समाजाचे सर्वात मोठा नेता असलेले दयानंद सरस्वती यांनी म्हटले आहे की,हिंदू मोघलांनी दिलेली शिवी आहे,ते शिवी ब्राम्हणांना मान्य नाही.म्हणून आम्ही हिंदू धर्मीय नाही तर ब्राम्हण धर्मीय आहोत.
मात्र,स्वातंत्र्यानंतर ब्राम्हणांनी भारत देशातंर्गत मुळ निवासी बहुजन समाज घटकातील अज्ञानी व समज नसलेल्या नागरिकांना हिंदू धर्म या शब्दानुसार सबोत घेऊन सत्ता,प्रशासन,मिडीया,न्यायालये,औधोगिक क्षेत्रे,शैक्षणिक संस्था,आर्थिक संस्था आणि इतर संस्थांवर कब्जा केला.
ब्राम्हणाच्या कटकारस्थानामुळे भारत देशातील मुळ निवासी बहुजन समाज हा त्यांच्या अधिकारापासून कोसो दूर राहिला आणि अजूनही ठेवण्यात येत आहे असे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचे ठाम मत आहे.
त्यांचे हेही म्हणणे आहे की ब्राम्हण मुलभूत अधिकाराचे वारंवार उल्लंघन करतात,आम्ही चूप बसलोत तर ते आमच्यावर अन्याय करतील.म्हणूनच आमच्या मुलभूत अधिकारांसाठी आम्हाला नेहमी त्यांच्या विरोधात संघर्ष करावे लागेल…
ते वारंवार सांगतात की,भारत देशातील मुळ निवासी बहुजन नागरिकांच्या विरोधात शक्ती,समर्थन,डावपेचांचा दुरुपयोग आर.एस.एस. व भाजपा करतय.आम्हाला शक्ती,समर्थन,डावपेचांचा सद्उपयोग भारत देशांतर्गत मुळ निवासी बहुजन समाज घटकातील महीला-पुरुषांच्या मुलभूत संरक्षणासाठी करायचे आहे.
भाजपा व काॅंग्रेस हे एका शरिराचे दोन भाग आहेत.सत्तेवरुन पहिला जाते तर दुसरा येते आणि दुसरा सत्तेतून जाते तर पहिला येते..या एका शरिराच्या दोन भागांना काँग्रेस व भाजपा म्हणतात,असे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचे म्हणणे आहे..
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचा भारत मुक्ती मोर्चा (BMM) ही बामसेफ (BAMCEF) प्रणित एक प्रमुख जनआंदोलन संघटना आहे,जिची स्थापना २०१० मध्ये वामन मेश्राम यांनी केली.
ही संघटना मूलनिवासी बहुजन (SC, ST, OBC आणि अल्पसंख्याक) समाजाला संघटित करून सामाजिक न्याय आणि समतेसाठी,विशेषतः EVM विरोधात आणि बॅलेट पेपरच्या व नागरिकांच्या मुलभूत अधिकारांच्या समर्थनार्थ केंद्र सरकारविरुद्ध लढा देत आहे.
भारत मुक्ती मोर्चाचे प्रमुखउद्देश…
मूलनिवासी बहुजन समाजाला जागृत करणे,आरक्षणाचे संरक्षण करणे आणि संविधान विरोधी बाबींना विरोध करणे आहे.
याचबरोबर केंद्र सरकारकडे ओबीसींच्या जातीनिहाय गणनेची मागणी केली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपच्या धोरणांना व भुमिकांना सातत्याने भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी विरोध केला.
SC, ST, OBC आणि अल्पसंख्याक यांना देशातील ‘मूळ निवासी’ मानून त्यांना हक्क मिळवून देणे हा भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यापैकी एक प्रमुख भाग आहे.
भारत मुक्ती मोर्चाची कार्यपद्धत ही महत्त्वपूर्ण विषयांना घेऊन संघटना द्वारे रॅली काढणे,धरणे आंदोलन करणे,आणि जनआंदोलन करणे,व याद्वारे आपले मुद्दे सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आहे.तद्वतच भारत मुक्ती मोर्चा हा भारत देशातील मुळ निवासी नागरिकांच्या हितासाठी जनआंदोलनाचा कणा आहे….
म्हणूनच भारत देशांतर्गत ६२५ जिल्ह्यातील पदाधिकारी,सदस्य,कार्यकर्तागण हे लाखोंच्या संख्येने नागपूरकडे कुच करत असून ते २२ फेब्रुवारी २०२६ रोज रविवारला होणाऱ्या भारत मुक्ती मोर्चाच्या,”महामोर्चात,आपल्या मुलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी सहभागी होणार आहेत.
भारत मुक्ती मोर्चा द्वारा आर.एस.एस.कार्यालयावर जाणाऱ्या महामोर्चाची खबरदारी महाराष्ट्र पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली असून नागपूर शहरासह आर.एस.एस.कार्यालयाच्या सभोवताल ते चोख बंदोबस्त ठेवणार आहेत.


