स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही नैसर्गिक लोकशाही मूल्ये भारतात प्रथम त्यानंतर पर्यायाने जगात प्रस्थापित आणि अविष्कारीत करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाडचा सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन ही जाहीर आव्हानात्मक क्रांती करून भावी भारताच्या संविधानाचा पाया रचला…..!
या क्रांतीने तर सुमारे चौदाशे वर्षांपूर्वीच्या पुष्यमित्र शुन्गाने केलेल्या ब्रहद्रथाच्या खुनाचा बदला घेतला………
त्यामुळे मनुवाद्यांचे माथे ठणकले….. यानंतर त्यांनी सर्व शत्रू बाजूला ठेऊन केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच टार्गेट करून त्यांची क्रांती कशी थोपवता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
परंतू , कोंबडा डाळून ठेवला काय किंवा कापून खाल्ला काय, सूर्य तर उगवणारच ना…….!
शेवटी उगवलाच तो सू – दिन म्हणजे 26 नोव्हेंबर 1949…..
ही संविधानक्रांती या मनुवाद्यांच्या एवढी जिव्हारी लागली की, RSS ने केवळ चारच दिवसानी हे संविधान आम्हाला मान्य नाही म्हणून निषेध केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी बाबासाहेबांची जिवंत प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली………!
मग त्यांनी दृढनिश्चयच केला की,
इथून पुढे जेंव्हा जेंव्हा हे संविधान संपवण्यासाठी संधी मिळेल तेंव्हा तेंव्हा तीचा लाभ उठवायचा. म्हणून प्रथम त्यांनी संविधानातील मूलभूत हक्कच काढून टाकण्याची शिफारस अगदी पहिल्या घटनादुरुस्तीपासूनच सुरुवात केली.
यामध्ये पहिला प्रयत्न 1976 च्या 42 व्या घटना दुरुस्तीने करण्याचा प्रयत्न केल्या गेला. परंतू , त्यात त्यांना पूर्णपणे यश आले नाही.
परंतू , यात एक झाले की या 25 जून 1975 ते 1977 या काळातील एकवीस महिने देशात आणीबाणी होती. आणीबाणी उठल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीनंतर 24 मार्च 1977 रोजी जनसंघांचे ( पहिले बिगर काँग्रेसी ) मोरारजी देसाई यांच्या रूपात देशाला प्रधानमंत्री मिळाले. 1977 ते 1979 या दोन वर्षाच्या ( कमीजास्त प्रमाणात ) काळात प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडे राजकीय मुत्सदेगिरी नसल्याने आपला पारंपरिक शत्रू असलेल्या पाकिस्तानला मात्र याचा लाभ उठवता आला आणि पुढे जाऊन पाकिस्तान सुद्धा 1998 मध्ये अणूचाचणी करण्यात यशस्वी झाला. आणि आपली जी RAW ( Research and Anylisis Wing ) संस्था आहे, जी शेजारील शत्रू देशांची मायक्रो माहिती आपल्याला पुरवते. अशा RAW संघटनेची मुळे पाकिस्तानातून मुळासाहित उखडून फेकल्या गेली. त्याचा थोडक्यात इतिहास पुढीलप्रमाणे आहे.
भारताचे 1962 आणि 1965 चे चीन आणि पाकिस्तान सोबत युद्ध झालेलेच होते. त्यामुळे इंदिरा गांधी यांना असे वाटत होते की, आम्हाला एखादी गुप्तहेर संघटनेची गरज आहे. निदान शेजारील शत्रू राष्ट्रातील आमच्या विरोधातील कारवायाची माहिती मिळेल. म्हणून त्यांनी RAW ची स्थापना 1968 मध्ये केली. या RAW चे पहिले प्रमुख होते R. N. KAW ( आर. एन. काव ). जे या क्षेत्रातील जगातील पहिल्या पाच इंटेलिजन्ट्स पैकी एक होते, त्यांची नियुक्ती इंदिरा गांधी यांनी केली. या RAW चे सदस्य देशाबाहेर जावून काम करत असत ( देशांतर्गत काही करण्याची यांना मुभा नव्हती ). पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तानमध्ये जाऊन तेथील भारतविरोधी गुप्त कारवायाची माहिती घेऊन रिपोर्टींग थेट प्रधानमंत्र्याशी करत असत.
जेंव्हा भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणूचाचणी यशस्वी केली, तेंव्हा मात्र पाकिस्तानचे धाबे दणाणले. त्याला आता भारतापासून धोका निर्माण झाल्याची भीती वाटायला लागली. कारण भारताकडे अणुबॉम्ब आहे आमच्याकडे नाही. म्हणून पाकिस्तानने लागलीच गुप्तपद्धतीने रावळपिंडीजवळ कठूआ येथे अणूचाचणी करत असल्याची गुप्त माहिती किंवा अफवा RAW ने मिळविली ( पुरावे मात्र कोणतेही हाती नव्हते. भारताकडे आता अणुबॉम्ब असल्याने फ्रांस आणि चीन यांनी मात्र पाकिस्तानच्या विनंतीवरून प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्राची मदत करत गेले. ही मदत चालू असतांना पाकिस्तानचे एकमेव अणू शास्त्रज्ञ् अब्दुल कादिर खान हे जेव्हा उत्तर कोरीयाला भेटीसाठी गेले. तेंव्हा पाकिस्तानला मदत करणाऱ्या फ्रांस आणि चीनला पाकिस्तानच्या यशस्वी अनुचाचणी करण्याची शक्यता वाटू लागल्याने फ्रांस आणि चिनने पाकिस्तानची मदत थांबवली.
या दरम्यानच्या काळात पाकिस्तानचे हे अनुचाचणी यशस्वी करण्याचे प्रयत्न अजूनही गुप्तपद्धतीने चालूच होते.
आतापर्यंत ही गुप्त माहिती काढण्यासाठी RAW च्या पाकिस्तानातील सदस्यांनी खूप प्रयत्न केले. पण यश येत नव्हते. कोणताही भक्कम पुरावा हाती लागत नव्हता. दरम्यानच्या काळात भारतात आणीबाणी लागू होऊन संपून पुन्हा नवीन लोकसभा गठीत झाली इंदिरा गांधींचे सरकार जावून जनसंघ पक्षाचे नेते मोरारजी देसाई प्रधानमंत्री बनले. आता RAW ला मोरारजी देसाई यांनाच नियमाप्रमाणे रिपोर्टींग करावे लागायचे.
याच दरम्यानच्या काळात RAW ने पाकिस्तानात एक मोठा अनुचाचणी प्रयोग यशस्वी करण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात असल्याची अफवा किंवा गुप्त माहिती मिळविली. त्याचे पुरावे गोळा करण्याचे सुद्धा प्रयत्न चालू केले. कारण RAW ही भारताची गुप्तहेर संघटना होती. जी शेजारील शत्रू राष्ट्रातील भारताविरोधातील कारवायाची गुप्त माहितीचा अहवाल थेट प्रधानमंत्र्याशी देत असे.
म्हणून जेंव्हा आपल्या RAW ने कठूआ येथील प्रयोग शाळेत अणूचाचणी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. अशी गुप्त माहिती मिळाली, आणि आपल्या RAW चे सदस्य लगेच आपल्या कामाला लागले.
त्यासाठी त्यांनी त्या लॅबोरेटरी समोर एक न्हाव्याचे दुकान होते. त्या दुकानात लॅबोरेटरीतील शास्त्रज्ञ् आपले केस कापण्यासाठी येत असत. मोठ्या महतप्रयासाने त्यांना त्या न्हाव्याच्या दुकानात येणाऱ्या शास्त्रज्ञाचे कापलेले केस त्यांना मिळाले. ते केसं भारतात पाठवून जेंव्हा आपल्या लाभमध्ये रिसर्च करण्यात आले तेंव्हा त्यातून हे निष्पन्न झाले की हे केसं त्या अणू शास्त्रज्ञाचे आहेत. जे अणूच्या प्रयोग शाळेत काम करतात ( अणूच्या प्रयोगशाळेत काम करताना त्या त्या व्यक्तीच्या शरिराच्या प्रत्येक भागावर त्याचे परिणाम झालेले असतात).
पुढे याच पाकिस्तानच्या प्रयोगशाळेतील महत्वाचे पुरावे हस्तगत करण्यासाठी एका शास्त्रज्ञाकडून ‘ब्लू प्रिंट ‘ मिळविण्यासाठी त्याला भ्रष्टाचाराचे लालूच दाखवून प्रयत्न केल्या गेले. तेंव्हा ती 10,000/- अमेरिकन डॉलर्सची डील होती भारताच्या दृष्टीने ही रक्कम फार मोठी नव्हती. ही लाच देऊन आपण पाकिस्तान अणूचाचणी करत आहे. ती सुद्धा फ्रांस, अमेरिका, चीन, यांच्या मदतीवर……
म्हणून आपल्याला जगात पाकिस्तानचा अन्वस्रसज्ज दहशतवादी देश म्हणून बुरखा फाडता आला असता. कारण तिथे नेमकीच लष्करशाही अस्तित्वात आली होती.
परंतु , तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांनी ती घालवली……
कारण प्रत्येक गोष्ट RAW ला नियमाप्रमाणे प्रधानमंत्र्याला सांगावी लागायची. त्यांनी होकार दिला तरच ती अस्तित्वात येणार होती. म्हणून RAW ने ही झालेली सर्व डील (Deal ) मोरारजी देसाई यांना सांगितली. तेंव्हा त्यांनी ती डील स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्यामते दुसऱ्याच्या देशात आपण ढवळाढवळ करणे नीतिमत्तेत बसत नाही. म्हणून त्यांनी पाकिस्तानच्या लॅबमधून पुरावे मिळविण्याची संधी घालवली.
एवढेच नाही, तर मोरारजी देसाई यांनी RAW वर होणारा खर्च 35 ते 40% बजेट कमी करून टाकले. तेंव्हा RAW चे पहिले अध्यक्ष राहिलेले आर. एन. काव यांनी ताबडतोब राजीनामा दिला……
एवढेच नाही तर इस्रायलच्या ‘मोसाद ‘ ( इस्राएलची गुप्तहेर संघटना RAW सारखीच काम काम करणारी पण जगात क्रमांक एकची संघटना ) गुप्तहेर संघटनेच्या मदतीने पाकिस्तानची ही लॅबच उडवून देण्याची योजना सुद्धा RAW ने आखली होती. मोसादची एवढीच मागणी होती की, ती लॅब आम्ही नष्ट करू. भारताने केवळ आमच्या विमानाला एक वेळ इंधन भरून द्यावे. कारण इस्राएल ते पाकिस्तान एवढ्या प्रवासात विमान एकदाच फुल इंधन भरून परतीच्या प्रवासात पुरत नाही, म्हणून. परंतू , तरी सुद्धा मोरारजी देसाई यांनी या कल्पनेला विरोध केला……..!
यावरच मोरारजी देसाई थांबले नाहीत तर, पुढे पाकिस्तानमध्ये जुल्फीकार अली भुत्तो यांना हटवून झीया- उल- हक प्रधानमंत्री बनले होते. जीया – उल – हक हे एकप्रकारचे हुकूमशहा होते. हुकूमशहा म्हणून त्यांची जगात बदनामी होऊ नये, पाकिस्तान हा लोकशाहीवादी देश नाही असा जगात गैरसमज होऊ नये म्हणून झीया – उल – हक यांनी जगातील प्रमुख देशांशी फोनवर संपर्क करून आपली बाजू मांडत होते.
असाच एक फोन त्यांनी मोरारजी देसाई यांना सुद्धा केला होता. तेंव्हा मोरारजी देसाई यांनी बोलण्याच्या ओघात हे ही सांगून टाकले की तुम्ही रावळपिंडीजवळ कठूआ येथे प्रयोगशाळेत अणूचाचणीसाठी संशोधन करत आहात. हे काय आम्हांला ठाऊक नाही का काय………?
तेंव्हा ताबडतोब झिया – उल – हक चे कानच टवकारले आणि क्षणभर आश्चर्यचकित झाले…….
पाकिस्तानने एवढी गुप्तता पाळून ही बातमी भारतीय प्रधानमंत्र्यापर्यंत कशी पोहोचली….?
यावर झिया – उल – हक चिंतन करत न बसता त्यांनी पाकिस्तानच्या खबऱ्यांना शिक्षा दिलीच, शिवाय RAW च्या पाकिस्तानातील सदस्यांना शोधू – शोधू पकडून त्यांना देहदंडाची शिक्षा केली.
अशा प्रकारे आमच्याच प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांनी पाकिस्तानची अन्वस्त्रधारी देश होण्याची स्वप्ने 1998 मध्येच काय, पण कधीच अन्वस्त्रधारी देश पाकिस्तान झालाच नसता. हे केवळ मोरारजी देसाई यांच्या नाकर्तेपणामुळे घडले…….!
अशा प्रकारे जनसंघ पक्षाचे मोरारजी देसाई पहिले बिगरकाँग्रेसी प्रधानमंत्री होते. ज्या इंदिरा गांधी यांनी देशाला अन्वस्त्रसज्ज देश पाकिस्तानच्या अगोदर बनवले. आणि अशी मोरारजी देसाईसारखी संधी इंदिरा गांधी यांना चालून आली असती, तर कदाचित पाकिस्तान अजूनही अन्वस्त्रधारी देश म्हणून उदयास आला नसता……!
आजपर्यंतचा इतिहासच आहे की काँग्रेसने देशाला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला आणि जनसंघ आणि भाजपाने सत्तेत येऊन देशाला लाचार बनवले………!!!


