Home Maharashtra आयटक हातपंप देखभाल दुरुस्ती कामगार संघटना, जिल्हा गडचिरोली द्वारे आमरण उपोषणाला सुरुवात.....

आयटक हातपंप देखभाल दुरुस्ती कामगार संघटना, जिल्हा गडचिरोली द्वारे आमरण उपोषणाला सुरुवात.. — हातपंप देखभाल व दुरुस्ती कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी व न्याय हक्कांसाठी जिल्हा परिषद गडचिरोली समोर बेमुदत आमरण उपोषण!…

राजेंद्र रामटेके

विशेष प्रतिनिधी

        आमरण उपोषणामध्ये जिल्ह्यातील विविध भागांतील हातपंप देखभाल व दुरुस्ती कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले असून,शासनाने त्यांच्या मागण्यांकडे तात्काळ लक्ष द्यावे,अशी मागणी करण्यात येत आहे. 

     नियमित मानधन,थकबाकीची त्वरित देयके,सेवा सुरक्षेची हमी तसेच इतर मूलभूत सुविधा देण्यात याव्यात,यासाठी हे उपोषण छेडण्यात आले असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

         दरम्यान,आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपोषणस्थळी भेट दिली.त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या रास्त असल्याचे मत व्यक्त केले.तसेच जिल्हा प्रशासनाने व संबंधित विभागाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

       यावेळी नीलकंठ साखरे,जनार्धन गावतुरे,गुरुदेव कुमरे,देविदास दुर्गे,पोचन्ना चेवूला,जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग राजेश ठाकूर,जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस नितेश राठोड,श्रीनिवास ताडपलीवार,विपुल येलटीवार सह कार्यकर्ते उपस्थित होते.