Home Maharashtra Kolhapur मध्ये मोठा निर्णय!,”डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी ‘इकबाल शेख’...

Kolhapur मध्ये मोठा निर्णय!,”डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी ‘इकबाल शेख’ यांची निवड…. — २८ वर्षांच्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या अनुभवाची दखल घेत,राज्य कार्यकारिणीने बैठकीत घेतला एकमताने निर्णय..‌

   अमान कुरेशी

जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर..

      दखल न्युज भारत

        अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी,अहिल्यानगर येथील एनटीव्ही मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक इकबाल शेख यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. 

          कोल्हापूर येथे संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

           इकबाल शेख हे गेल्या तब्बल २८ वर्षांपासून विदर्भ,मराठवाडा आणि खानदेश या विभागांत वरिष्ठ पत्रकार म्हणून कार्यरत असून,डिजिटल माध्यम क्षेत्रात त्यांनी भक्कम ओळख निर्माण केली आहे. 

          पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी असलेली त्यांची तत्परता,संघटनात्मक बांधिलकी आणि नेतृत्वगुण लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

                डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील डिजिटल क्षेत्रातील एक अग्रगण्य संघटना मानली जाते.महाराष्ट्रासह गोवा,कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात संघटनेचे जाळे विस्तारलेले आहे. 

          संघटनेच्या विस्तारासाठी आणि बळकटीसाठी इकबाल शेख यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

          निवडीनंतर बोलताना इकबाल शेख यांनी डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांच्या हक्क,सुरक्षितता आणि सन्मानासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.त्यांच्या निवडीमुळे पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध राजकीय,सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

         डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर अनुभवी नेतृत्व मिळाल्याने संघटनेची ताकद महाराष्ट्रभर अधिक वाढेल,असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.