युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णाच्या वतीने रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबिर दत्तकग्राम कृष्णापुर येथे 3/फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न झाले.
दि. 5 फेब्रुवारीला बौद्धिक सत्र पार पडले बौद्धिक सत्राचे अध्यक्ष डॉ.भारत कल्याणकर यांनी कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. बौद्धिक सत्राचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.कौशिक जोशी गणित विभाग प्रमुख प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट अमरावती विषय कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापन डॉ जोशी यांनी प्रसंगी सांगितले की,ए आय मुळे रोजगाराचे स्वरूप बदलत आहे काळानुसार आपल्याला बदलावे लागेल स्किल कौशल्यामुळे मनुष्याची बुद्धी तल्लख होते.
तो आपल्या क्षेत्रात पारंगत होतो आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणात विमा पॉलिसी किंवा इतर कोणतेही बचत करण्याचे माध्यम तयार केल्यास आर्थिक व्यवस्थापन व्यवस्थित होते आरोग्य विमा हा प्रत्येक कुटुंबाचा सध्या परिस्थितीत महत्त्वाचा कणा बनला आहे असे प्रतिपादन केले.
बौद्धिक सत्राचे सूत्रसंचालन विक्की पवार यांनी केले पाहुण्यांचा परिचय कुमारी रेणुका पेढेकर हिने करून दिला आभार कु.सेजल वाटाणे हिने केले.
संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला त्याच बरोबर रासेयो स्वयंसेवक व गावकऱ्यांसाठी हं.भ. प.श्री अनिरुद्ध महाराज साखरे गाय वाडी यांचा समाज प्रबोधन पर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाला रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.आशिष काळे, रासेयो स्वयंसेवक व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



