शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
आज सकाळी १०.०० वाजता चिमूर तालुक्यातील वहानगाव येथील आदिवासी सोसायटीच्या भव्य पटांगणावर,खालसा क्रिकेट क्लब वहानगाव द्वारा आयोजित अंडर आर्म टेनिस क्रिकेट टुर्नामेंटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
अंडर आर्म टेनिस क्रिकेट तुर्नामेंट कार्यक्रमाचे उद्घाटन साईशभाऊ वारजूकर,प्रशांतभाऊ कोल्हे,आदित्यभाऊ कारेकार यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांच्या साक्षीने पार पडले.

उदघाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून योगेंद्र सिंह यादव, ठाणेदार पो.स्टे.शेगाव (बु.),नागेंद्रभाऊ चट्टे, तालुका अध्यक्ष,युवक काँग्रेस कमिटी चिमूर,प्रशांतभाऊ डाहुले,युवक काँग्रेस कमिटी चिमूर,हरिचंद्र दडमल,उपसरपंच,ग्रा.पं. वहानगांव,युवराज भोयर,उपसभापती,आ.वि. सोसायटी वहानगांव,येरुनकर सर मुख्याध्यापक,जि.प.शाळा वहानगांव,मंगल मत्ते सचिव आ.वि.सोसायटी वहानगांव,रतनसिंग अंधरेले, अध्यक्ष गुरुद्वारा प्रबंधक कमिटी वहानगांव हे आवर्जून उपस्थित होते.
तर विशेष अतिथी म्हणून जसपालसिंग बावरी,बाजसिंग अंधरेले,नानकसिंग अंधरेले,गुरुमितसिंग अंधरेले,गुरनामसिंग अंधरेले,अर्जुनसिंग अंधरेले,अरविंदसिंग अंधरेले,मनजितसिंग अंधरेले,कुलजीतसिंग अंधरेले,मलिंदरसिंग अंधरेले,पंजाबसिंग अंधरेले,मानिकसिंग अंधरेले,बलबिरसिंग अंधरेले हे उपस्थित होते.
खालसा क्रिकेट क्लब वहानगावचे अध्यक्ष रानासिंग बावरी,उपाध्यक्ष परमजितसिंग अंधरेले,सचिव अमरदिपसिंग अंधरेले,सदस्य सागरसिंग,सबजितसिंग,हरदयालसिंग,मनप्रीतसिंग,जगदीपसिंग,भजनसिंग,करणसिंग,अभिजीतसिंग,जसवंतसिंग,संग्रामसिंग,अर्जुनसिंग हे सुद्धा उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.

अंडर आर्म टेनिस क्रिकेट टुर्नामेंटच्या निर्णय कमिटीमध्ये पवनसिंग बावरी,भरतसिंग अंधरेले,नानकसिंग बावरी,शिवराजसिंग अंधरेले यांचा सहभाग आहे.
प्रवेश हेतु संपर्क….
पवनसिंग मो. 8605522763,दिलराजसिंग मो. 8767199518,बलराजसिंग मो. 9834509728 यांच्या सोबत संपर्क करण्याचे आवाहन क्लब पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी केले आहे.
नियम व अटी….
प्रत्येक सामना सहा ओवर खेळवला जाईल.अंतिम सामना आठ ओवरचा राहिल.ओवर कमी जास्त करण्याचा अधिकार फक्त मंडळाला राहील.
प्रत्येक सामन्यात बॉल मंडळाकडून विकत घ्यावे लागेल.पंचाचा निर्णय अंतिम राहील.नैसर्गिक आपतीस मंडळ जबाबदार राहणार नाही.
काही अडचणी असल्यास पंच हे संघाला बाहेर काढू शकतिल असा त्यांना अधीकार आहे.पहिल्यास दिवशी १२ खेळाडूंची यादी मंडळात जमा करावी लागेल.
प्रथम बक्षीस…
२० हजार रुपये असून, शंकरपूर येथील माजी सरपंच तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस साईशभाऊ वारजूकर यांच्याकडून देण्यात येणार आहे.
द्वितीय बक्षीस….
द्वितिय बक्षिस १० हजार रुपये असून,हे बक्षिस आदित्य भाऊ कारेकार तंटामुक्त समिती अध्यक्ष ग्रामपंचायत सावरी (बिड.) यांचेकडून देण्यात येणार आहे.
तृतीय बक्षीस…
तृतीय बक्षीस ७ हजार रुपये असून हे बक्षीस प्रशांत कोल्हे माजी सरपंच वहानगाव तथा सिंग बाॅब्ज वहानगाव यांच्याकडून देण्यात येणार आहे.
वैयक्तिक बक्षीस….
बेस्ट बाॅलर,बेस्ट बाॅटस्मन,बेस्ट बाॅलर,बेस्ट किपर,यांना देण्यात येणार आहेत..
टिप – वहानगांव हे गांव चिमूर वरोरा रोडवर चिमूरवरून १५ किमी. अंतरावर आहे.


