युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
जि.प.प्राथमिक शाळा धानोरा (शिक्रा) येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्यात लहान चिमुकल्यांनी विविध वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर करीत गावकऱ्यांची मने जिंकली. याप्रसंगी सुबोध योगीराज टेंभरे यांने भारतीय प्रजासत्ताक या विषयी आपले विचार व्यक्त केले.
शाळेमध्ये युवा प्रशिक्षणार्थी म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सुरज जुनघरे यांना शाळेच्या वतीने स्मृतिचिन्ह, फोटोफ्रेम व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले. शाळेची विकासकामे नळ जोडणी, रंगरंगोटी, स्टाईल बसविणे, ह्यांडपंप दुरुस्ती, टिनपत्र्याचे कुंपण आणि शालेय मैदान सपाटीकरण करिता ग्रामपंचायतने भरीव योगदान दिल्याबद्दल गावाचे उपसरपंच मारोती रामटेके यांचा शाळेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमध्ये मुख्याध्यापक दिपक धांडे व सुरज मंडे आणि सुरज जुनघरे यांनी चालू सत्रामध्ये शाळेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणून शाळेचा कायापालट केल्याबद्दल चंद्रभान जुनघरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक दिपक धांडे यांचा तर वंदना जुनघरे यांनी सुरज मंडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
रामपाल बद्रे आणि सुशिला डोंगरे यांनी सुद्धा शिक्षकांचा व सुरज जुनघरे यांचा कौटोबिक सन्मान केला. ज्योत्स्ना डोंगरे यांनी शाळेला सावित्रीबाई यांची फोटोफ्रेम सरपंच लता मालगावे यांचे हस्ते प्रदान केली तर सुरज जुनघरे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेची मोठी फोटोफ्रेम शाळेला भेट दिली. माजी शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष रव ठाकरे यांनी त्यांची मुलगी कोमल हिच्या वाढदिवस निमित्त सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त शालेय किट वैशाली ठाकरे यांचे हस्ते शाळेला भेट दिली.
ह्या भरगच्च कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता रविभाऊ ठाकरे, किशोर गरड, योगिराज टेंभरे, वसंतराव टेंभरे, अश्विनीताई मेश्राम, शकिला बानो, तामगाडगे ताई तसेच सर्व गावकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर स्वयंसेवक म्हणून रुद्र रामपाल बद्रे, वेदांत रुपेश स्थूल, राहुल पद्माकर खंबरे, जयदीप दिलीप चौधरी, सर्वेश प्रदीप चौधरी, डोमा फुलचंद मारब्दे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.
कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल पडोळे उपाध्यक्ष माधुरी पाटील आणि शा.व्य.समिती सर्व सभासद आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक, गावातील वेगवेगळ्या मंडळाचे पदाधिकारी सर्व पालक व बहुसंख्य नागरिक, बचत गट महिला मंडळी, युवक – युवती व माजी विद्यार्थी उपस्थीत होते.



