चिरफाड
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चिमूर तालुक्यात अवैध धंदे सपाटून सुरु आहेत.अवैध धंदेवाईकांना पोलिसांचे पाठबळ असल्याशिवाय अवैध धंदेवाईक आपले धंदे सुरु ठेवू शकत नाही.यामुळे पोलिस अधिकाऱ्यांना जनतेच्या सुरक्षेसी काहीच संबंध नाही असे अवैध धंदे सुरु असलेल्या घटनाक्रमावरुन लक्षात येते आहे.
म्हणूनच जनतेच्या सुरक्षेकडे व अवैध धंद्याकडे पाठ फिरवणारे स्थानिक पोलिस अधिकारी हे असंवेदनशील व कर्तव्यहिन आहेत काय? असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो आहे.
पोलिस वर्दीचा मान हा पोलिसांच्या उत्तम कर्तव्यात दडलेला आहे.पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी जर अवैध धंद्याकडे जाणिवपूर्वक पाठ फिरवित असतील तर उत्तम कर्तव्य पार पाडण्यासाठी ते तयार नाहीत किंवा त्यांची उत्तम कर्तव्य पार पाडण्याची मानसिकता नाही हे अधोरेखित होते.
चिमूर तालुक्यातील पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी हे आपापल्या कार्यक्षेत्रातील अवैध धंदे बंद करुन नागरिकांचे योग्य संरक्षण करण्यासाठी धडपडत नसतील तर त्यांच्यात योग्य कर्तव्याचा जिवंतपणा नाही असेच म्हणावे लागेल.
अवैध धंद्याकडे जाणिवपूर्वक होणारे दुर्लक्ष वर्दीची इज्जत चुरचुर करणारी व कलंकित करणारी ठरु नये,याचे भान चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी,चिमूर व भिसी ठाणेदार यांना आहे काय? याचे उत्तर चिमूर तालुक्यातील नागरिकांना कोण देणार! …
केवळ राजकारण्यांची हुजरेगिरी करण्यासाठी व विशेष वेळेत बंदोबस्तासाठी पोलिस नाहीत तर ते विशेषतः जनतेच्या संरक्षणासाठी आहेत,या त्यांच्या जनसेवक कर्तव्याला अवैध धंद्याच्याआड नाकारणारे पोलिस अधिकारी कोणत्या सचोटीचे आहेत,याचे जबाबदेही उत्तर कोण देईल?
अवैध धंदेवाईकांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही,यामुळे अवैध धंदेवाईकांचे जाळे अख्या तालुक्यात पसरले आहे.म्हणूनच पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस वर्दीची आब राखता येत नाही,असे वास्तव चित्र आहे…
चिमूर तालुकातंर्गत अवैध धंद्याचे म्होरके पाच गावात बसले असून चिमूर,भिसी,नेरी,शंकरपूर,मोटेगाव हि त्यांची स्थळे आहेत.तर या म्होरक्याची व्यवसायीक उपस्थळे अख्या चिमूर तालुक्यातील ग्रामीण भाग आहेत.
मौजा जांभुळघाट,मौजा मासळ,मौजा खडसंगी,मौजा शंकरपूर,मौजा भिसी,मौजा महालगाव,मौजा नेरी,मौजा मोटेगाव,मौजा चिमूर बिटात असलेले अवैध धंदे पाच गावांतील म्होरके सांभाळत आहेत.याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना नाही,असे म्हणता येत नाही.
दारु,सट्टा,जुगार,या अवैध धंद्याचे मुख्य म्होरके हे चिमूर,भिसी,मोटेगाव,नेरी, शंकरपूर येथे असतांना,पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी हे त्यांच्या मुसक्या आवळू शकत नाही,याला त्यांचा नाकार्तेपणाच म्हणावे लागेल.
चिमूर व भिसी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक बिटात अवैध धंदे सुरु नाही,असे जर स्थानिक पोलीस अधिकारी वरिष्ठांना माहिती देत असतील तर चंद्रपूर येथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या अनेक टिम चिमूर तालुक्यात पाठवावे व चिमूर तालुक्यातील नागरिकांकडून अवैध धंद्याबाबत गोपनीय माहिती घ्यायला हवी.
सत्तेपुढे शाहाणपण चालत नाही असी जर भुमिका पोलिस अधिकाऱ्यांची असेल तर,त्या सत्ताधाऱ्यांचे चारित्र्यहरण करण्याचा अधिकार पोलिस अधिकाऱ्यांना आहे,हे ते नाकारु शकत नाही.
तद्वतच अवैध धंद्यामुळे शांतता भंग होत असतांना,अनेकांचे संसार उघड्यावर येत असताना,हजारो संसाराची धुळधाणी होत असताना,हजारों कुटुंबीय दारिद्र्यात लोटले जात असताना,जनतेचे योग्य संरक्षण करण्यासाठी,जनतेच्या उन्नतीसाठी,राजकारणी आड येत असतील ते क्रिमनल विचारांचे आहेत असे म्हणावे लागेल.
म्हणूनच अशा क्रिमिनल राजकारण्यांचे पाप धुत राहण्यापेक्षा अवैध धंदे बंद करुन जनतेला सुरक्षित करणे पोलिसांची उत्तम जबाबदारी आहे हे त्यांनी विसारायला नकोय….
जिद्दीला संकल्पनेत उतरवून अधिकारी बनलेत,अधिकारी बनताना शपथ घेतली,त्याच सपथेला अनुसरून अधिकारांतर्गत जनहितासाठी धैर्य दाखवायला चिमूर व भिसी पोलिस स्टेशन प्रमुखांना कोण रोखतय!,”त्यांची संकुचित मानसिकता?



