Home Maharashtra पात्र ekyc धारक लाडक्या बहिणींना लाभ नाही त्यांनी ३१मार्च पर्यंत दुरुस्ती करावी...

पात्र ekyc धारक लाडक्या बहिणींना लाभ नाही त्यांनी ३१मार्च पर्यंत दुरुस्ती करावी :- माजी आ.कृष्णा गजभे….

ऋषी सहारे 

   संपादक

           आरमोरी विधानसभासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील लाडकी बहीण योजना अंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान अपुऱ्या माहितीमुळे जिल्ह्यातील हजारों महिला लाभार्थी थेट योजनेतून बाद झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. परिणामी, पात्र असूनही या महिलांना नोव्हेंबर नंतर डिसेंबरचाही हप्ता मिळाला नाही.

           लाडकी बहीण E-kyc प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली e-KYC माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे.

         आ.कृष्णा गजबे यांनी आज महिला व बालकल्याण विभाग अधिकारी सौ.ज्योती कडू मॅडम यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

            हप्ता खात्यावर जमा न झाल्याने लाभार्थी महिलांनी महिला व बालकल्याण विभागात चौकशीसाठी धाव घेतली असता, आधार क्रमांकाच्या तपासणीत त्या अपात्र ठरल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र ही चूक मुद्दाम केलेली नसून माहितीअभावी किंवा तांत्रिक कारणांमुळे झाल्याचे महिलांचे म्हणणे आहे.आ.कृष्णा गजबे

              या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच बाब लक्षात घेऊन आ.कृष्णा गजबे यांनी महिला व बालकल्याण विभाग अधिकारी सौ.ज्योतीताई कडू मॅडम यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी.