शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुक्यातील नेरी येथे शिवगर्जना क्रीडा मंडळ नेरीच्या वतीने दि ७-२-२६ ते ९-२-२६ पर्यंत 58 किलो वजना अंतर्गत भव्य रात्र कालीन कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
सदर स्पर्धेचे उद्घाटन दिनांक ७-२-२६ ला रात्री ७.३० वा. करण्यात आले होते.या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रामदास सहारे माजी सरपंच होते.
उद्घाटक म्हणून संदीप पिसे ग्रामपंचायत सदस्य नेरी,विशेष अतिथी म्हणून यशवंत कामडी सदस्य ग्रामपंचायत नेरी,द्रोणेश्वर पिसे सेवानिवृत्त शिक्षक,दिवाकर पिसे व्यवस्थापक गुरुदेव सेवा मंडळ तसेच दिगंबर लोथे उपस्थित होते.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिवाकर पिसे होते.बक्षीस वितरक म्हणून डॉक्टर जगदीश पिसे तर विशेष अतिथी म्हणून यशवंत कामडी सदस्य ग्रामपंचायत नेरी,नानाजी दडमल ग्रामपंचायत सदस्य,सुरेश बनकर ,सौ.ललिता कडूकार ग्रामपंचायत सदस्य,द्रोणेश्वर पिसे,राकेश सहारे उपस्थित होते.
या तीन दिवशी खेळामध्ये कोणतीही गालबोट न लागता कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडली.या स्पर्धेत प्रथम क्रमांक छत्रपती क्रीडा मंडळ नवरगाव यांनी पटकावला.
त्यांना आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांचे कडून २० हजार रोख तसेच ओम भाऊ खैरे यांच्याकडून ट्राफि प्रदान करण्यात आली.
द्वितीय क्रमांक राष्ट्रसंत क्रीडा मंडळ खांबाडा यांनी पटकावला,त्यांना संजयभाऊ डोंगरे उपाध्यक्ष सिडीसीसी बँक चंद्रपूर व विजय कडूकार सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून रोख ७ हजार रुपये,तसेच प्रफुल वाघमारे यांच्याकडून ट्राफी देण्यात आली.
तृतीय क्रमांक शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळ वडसी यांनी पटकावला,त्यांना संदीप पिसे सदस्य ग्रामपंचायत नेरी,तसेच पिंटू खाटीक अध्यक्ष तंटामुक्ती यांच्या तर्फे ७ हजार रुपये देण्यात आले,तसेच राकेशजी सहारे यांच्याकडून ट्राफी देण्यात आले.
चतुर्थ बक्षीस शिवगर्जना क्रीडा मंडळ नेरी यांना यशवंत कामडी ग्रामपंचायत सदस्य व स्वप्निल बारस्कर यांच्याकडून ५ हजार रोख तथा ट्रॉफी देण्यात आली.
वैयक्तिक बक्षीस उत्कृष्ट रीडर यांना ट्राफी प्रभाकर लोथे गुरुजी यांच्याकडून,उत्कृष्ट डिपेंडर प्रणय भरडे यांना ट्राफी पांडुरंग मेश्राम यांचे कडून,तसेच उत्कृष्ट ऑल राऊंडर लखन देवारे यांना ट्रॉफी डॉ.जगदीश पिसे यांच्याकडून देण्यात आली.
या कार्यक्रमाचे संचालन प्रस्ताविक आभार प्रदर्शन प्रभाकर लोथे यांनी मांनले.या कबड्डी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शिवगर्जना क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.


