Home Crime पोलिसांनी अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करुन नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी झटकली?

पोलिसांनी अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करुन नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी झटकली?

  रोखठोक

प्रदीप रामटेके

 मुख्य संपादक

         अवैध धंदे (मटका, जुगार,दारूविक्री,अमली पदार्थ) रोखणे ही महाराष्ट्र पोलिसांची प्राथमिक जबाबदारी आहे,ज्यासाठी ते,”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय,ब्रीदवाक्यानुसार कारवाई करतात असे म्हटले जाते.

        मात्र,चिमूर तालुकातंर्गत पोलिस यंत्रणेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अवैध धंद्यांमध्ये वाढ होत असल्याने चिमूर व भिसी पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

         अवैध धंदे रोखणे ही थेट पोलिसांची जबाबदारी आहे,असे Lokmat अहवाल सांगतो. 

         परंतु चिमूर तालुकातंर्गत अवैध धंदे सपाटून सुरु असल्याने,पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या भूमिकेवर गंभीर स्वरुपाचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

                  अवैध धंद्यांवर कारवाई न झाल्यास पोलिसांची नाचक्की होते,तर काही प्रकरणांमध्ये कारवाईचा धाक नसल्याने हे धंदे बोभाट सुरू असल्याचे Pudhari अहवाल सूचित करतो आहे.

            अवैध धंद्यांवर जरब बसवणे ही पोलिसांची भूमिका महत्त्वाची असली,तरी भ्रष्ट आचरणामुळे (वसुली) काही ठिकाणी पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचे दिसून येते.यात चिमूर तालुक्यातील पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असल्याचे दिसून आले आहे.

        पोलीस म्हणजे कायदा व सुव्यवस्था राखणारी,गुन्हेगारी रोखणारी आणि जनतेच्या मालमत्तेचे व जीविताचे रक्षण करणारी एक सरकारी यंत्रणा किंवा त्यामधील अधिकारी होय,ज्यांना आवश्यक तिथे बळाचा वापर करण्याचेही अधिकार असतात.

         पोलिसांचे मुख्य काम समाजात शांतता व सुव्यवस्था राखणे,गुन्हे तपाणे आणि गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देणे हे आहे,ज्यामुळे नागरिक सुरक्षित राहतात.  

         समाजातील शांतता आणि सुव्यवस्था टिकवणे हे पोलिसांचे प्राथमिक काम आहे.तद्वतच गुन्हे घडण्यापासून रोखणे आणि घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना पकडणे व जनतेचे रक्षण करणे,नागरिकांचे जीवन आणि मालमत्तेचे संरक्षण करणे हे पोलिसांचेच काम आहे. 

           पोलीस दल हे राज्य सरकारचा भाग असून,त्यात विविध पदांचे अधिकारी असतात,जसे की पोलीस निरीक्षक,सहायक पोलीस आयुक्त,पोलीस अधीक्षक इत्यादी.

            म्हणूनच पोलिसामुळे आपण सुरक्षित आहोत,अशी जनभावना त्यांच्याप्रती नागरिकांची असणे आवश्यक आहे हे चिमूर व भिसी पोलिसांना लवकर कळायला हवे,यातच त्यांचा सन्मान व आदर दडलेला आहे हे त्यांनी ओळखले पाहिजे!….