रोखठोक
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
महाराष्ट्र राज्यासह चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने याला जबाबदार कुणाला धरायचे?,हा प्रश्न आता गुंतागुंतीचा होवू लागला आहे.
मात्र,जबाबदार अधिकारी व जबाबदार पोलिस अधिकारी हे अवैध धंद्याकडे कमालीचे दुर्लक्ष करुन पोलिस विभागाच्या चारित्र्याला कलंकित करीत असल्याचे दिसून येत आहे.
याचबरोबर अवैध धंद्यामुळे पोलिस विभागाची डागाळत असलेली प्रतीमा,ते पुसून टाकू शकत नाही हे वास्तव आहे…
परंतु अवैध धंद्यांना अनुसरून सुरू असलेल्या हप्तेखोरीची चर्चा जनमानसात रुढ झाली असून,अवैध धंदेवाईकांकडून पोलिस विभागाला दरमहा मोजण्यात येणारी रक्कम ही भरभक्कम असल्याचे नाकारता येत नाही.
शहरी व ग्रामीण भागातील महिलां-पुरुषांचे म्हणणे आहे की,पोलिस जर हप्तेखोर नाहीत तर ते गावोगावी सुरू असलेले देशी-विदेशी दारुचे,सट्टाचे व जुगाराचे अवैध धंदे,बंद का म्हणून करीत नाही?…
गावोगावी अवैध धंदावाईकांची वाढत असलेली मुजोरी,पोलिस विभागाच्या छत्रछायेचा व आशिर्वादाचा एक भाग आहे हे व्यसनाधीनतेला बळी न पडणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.
तद्वतच पोलिसांचे मित्र हे पोलिस पाटील व माहितीगार पोलिस मित्र नसून अवैध धंदेवाईक असल्याचे बोलले जात आहे.यामुळे अवैध धंदेवाईकांचा लगाव पोलिस विभागाला आनंद व समाधान देणारा ठरत असल्याचे चित्र आहे..
पण,सर्व समाज घटकातील महिलांच्या,पुरुषांच्या,विद्यार्थ्यांच्या,युवक,युवतीच्या सर्व प्रकारच्या सुरक्षेबाबत ऐरणीवर असलेला प्रश्र्न,पोलिस विभागाच्या अकार्यक्षमतेवर वारंवार डाग लावतो आहे,याची शरम आता शहरी व ग्रामीण भागातील महिलां-पुरुषांना वाटू लागली आहे,याचे काय?
महाराष्ट्र राज्यासह चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असल्याने,याबाबत कुणाला सांगायचे? कुणाकडे तक्रार करायची? हे जिल्हाधिकाऱ्यांनी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जनतेला आपल्या माध्यमातून सांगायला पाहिजे व त्यांच्यातील असुरक्षिततेची भावना कमी करायला पाहिजे,या मताची जनता आहे.
ज्यांच्या खांद्यावर जनतेची सुरक्षा आहे त्या पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध धंद्याकडे पाठ फिरवून जमणार नाही हे त्यांना केव्हा कळणार? हा अंतर्मुख करणारा मुद्दा आहे…
पण,पोलिस विभागाच्या मनात अवैध धंद्यावाईकांची सुरु असलेली घुसखोरी चिंतेचा गंभीर विषय बनत चाललेला आहे,हे पोलिस विभाग नाकारेल काय?
पोलिस विभागाचे उत्तम चारित्र्य व त्यांचा आद्यम विश्वास भरुन काढायचा कसा,याची चिंता नागरिकांना आहे याची जाणीव पोलिस विभागाला कदाचित नसेल!
स्वत:ची जबाबदारी आणि क्षमता जाणून अविरत कर्तव्य करणारी ती शक्ती म्हणजे पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी होत.यामुळे त्यांच्या शौर्याचा मानसन्मान सातत्याने जनमानसात राहायलाच पाहिजे!…



