Home Political दत्तात्रय (आण्णासाहेब) काळे हे नवे पंचायत समितीचे सदस्य पहावयास मिळणार,गावोगावी मतदारांच्या चर्चा…...

दत्तात्रय (आण्णासाहेब) काळे हे नवे पंचायत समितीचे सदस्य पहावयास मिळणार,गावोगावी मतदारांच्या चर्चा… — तरुण मतदार व कार्यकर्ते पाठीशी आहेत म्हणूनच मतदार संघातील सर्व गावांचा चौफेर विकास होणारच :- दत्तात्रय आण्णासाहेब काळे… 

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

          लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीतील सुपुत्र व काळे परिवारातील ढाण्या वाघ आणि पंचायत समितीचे भावी सदस्य दत्तात्रय (आण्णासाहेब) काळे हे पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूकीसाठी लुमेवाडी गणातून उभे असल्यामुळे भागाभगातून तरुण कार्यकर्त्यांची चांगलीच साथ मिळालेली आहे. 

           दत्तात्रय (आण्णासाहेब) काळे यांच्या प्रचाराला मतदार संघातून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, विजयसिंह शिवतारे, यांचे हात बळकट करण्यासाठी व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान रुपी धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून आशीर्वाद द्या.

           इंदापूर तालुक्याच्या काना कोपऱ्यात शिवसेनेला साथ मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गावोगावी भेटी, संवाद आणि विकासा भिमुख यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. लुमेवाडी गणात परिवर्तन होणारच असल्याचे दिसू लागले आहे.

           उमेदवार दत्तात्रय (अण्णासाहेब) काळे यांना मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने परिसरात वातावरण चांगलेच निर्माण झालेले आहे. नरसिंहपुर, टणु , गिरवी, पिंपरी बुद्रुक, ओझरे, गोंदी, लुमेवाडी, सराटी, चाकाटी, निमगाव भगतवाडी आधी सर्व भागातील मतदार शिवसेनेला साथ देऊन धनुष्यबाण चिन्हावर मतदान करून जास्तीत जास्त मतांनी दत्तात्रय काळे यांनाच विजय करणार असल्याचे बोलत आहेत. प्रचाराचा अंतिम टप्प्या चालू असून मतदान घडवून येण्यासाठी आणखी गती मिळालेली आहे दत्तात्रय (आण्णासाहेब) काळे हे जास्त मतदान मिळवून पंचायत समितीवर विजय मिळवतील. हे चित्र पहावयास मिळणार.