बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
2026 च्या पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूकीसाठी लुमेवाडी गणात पंचायत समितीचे उमेदवार दत्तात्रय (अण्णासाहेब) जगन्नाथ काळे यांच्या प्रचाराला मतदार संघातून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, विजयसिंह शिवतारे, यांचे हात बळकट करण्यासाठी व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान रुपी धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून आशीर्वाद द्या.
इंदापूर तालुक्याच्या काना कोपऱ्यात शिवसेनेला साथ मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गावोगावी भेटी, संवाद आणि विकासा भिमुख यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. लुमेवाडी गणात परिवर्तन होणारच असल्याचे दिसू लागले आहे.
उमेदवार दत्तात्रय (अण्णासाहेब) जगन्नाथ काळे यांना मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने परिसरात वातावरण चांगलेच निर्माण झालेले आहे.
नरसिंहपुर, टणु , गिरवी, पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, ओझरे, गोंदी, लुमेवाडी, सराटी, चाकाटी, आधी सर्व भागातील मतदार शिवसेनेला साथ देऊन धनुष्यबाण चिन्हावर मतदान करून जास्तीत जास्त मतांनी दत्तात्रय काळे यांनाच विजय करणार असल्याचे बोलत आहेत. जसजशी मतदान तारीख जवळ येईल, तस तशे मतदार व कार्यकर्त्याचा पाठिंबा मिळत आहे.



