मुळात माणूस स्वार्थी आणि अहंकारी आहे,अर्थात हे दोन्हीही दुर्गुण आहेत,हे दुर्गुण परिस्थितीने आणि संस्काराने कमी किंवा जास्त होतात.म्हणजेच भौतिक परिस्थिती विषमतेची आणि कुसंस्काराची असेल तर यात वाढ होते,आणि भौतिक परिस्थिती समतेची आणि सुसंस्काराची असेल तर स्वार्थ आणि अहंकार या गुणात घट होते.
उच्चनीचतेची,वरिष्ठकनिष्ठतेची भावना विचार म्हणजेच अहंकार गर्व होय.अहंकार माणसाला स्वार्थी बनवते.स्वार्थ जेंव्हा आती होतो तेंव्हा माणसाला मोह उत्पन्न होतो,आणि येथून माणसाच्या दुःखाची सुरुवात होते.म्हणून बुद्धाने म्हटले आहे की,मोहातूनच इच्छा आकांक्षा निर्माण होतात,म्हणून मोह हा दुःखाचे मूळ कारण आहे.
माणसाला जेंव्हा मोह होतो,म्हणजे तो अती स्वार्थी आणि लोभी बनतो, अती सुखाची,ऐश आरामाची,वर्चस्वाची जिंदगी जगू पाहतो.या त्याच्या हेतूने प्रेरणेने तो माणुसकी विसरतो,नातेसंबंध विसरतो,प्रेम,सहकार्य,आपुलकी,विश्वास,उदारता, सहिष्णुता या गुणास पारखा होतो,नैसर्गिक साधनसंपत्ती आणि मानवनिर्मित साधनसंपत्ती आपल्या ताब्यात घेण्यासाठी सत्ता हाती घेतो,किंवा तिचा दुरुपयोग करतो,सत्तेचा गैरवापर आपल्या स्वार्थासाठी करतो,आपली प्रॉपर्टी वाढविणे आणि वाढलेली प्रॉपर्टी जपून ठेवण्यासाठी कायम आपल्या हाती सत्ता ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.
यातून आर्थिक विषमता वाढते आणि ही आर्थिक विषमता सामाजिक विषमतेला पूरक ठरते,नव्हे सपोर्टेड होते.म्हणजेच आर्थिक आणि सामाजिक विषमता या दोन्ही संख्या बहिणी आहेत.ज्या एकमेकांची काळजी घेतात.
ही आर्थिक किंवा सामाजिक ( जाती धर्म संस्कृती ) विषमतेचे मूळ कारण आहे ‘ वंशवाद ‘.
मी आणि माझी प्रॉपर्टी माझ्याच मुलामुलीस किंवा वंशाला मिळाली पाहिजे,म्हणून वंशाचा दिवा किंवा वारसदार निश्चित करणेसाठी एक रूढी परंपरा पाडण्यात आली.तशी सांस्कृतिक परंपरा निर्माण करण्यात आली.” हा माझाच वंश आहे ” हे दाखवण्यासाठी काही संस्कार निर्माण करण्यात आले,जसे की,डोहाळे जेवणाचे आमंत्रण, बारसे,लग्न विवाह,हनिमून.
माझ्या प्रॉपर्टीचा वारस हा माझाच असावा,या विचारातूनच ( नव्हे या प्रॉपर्टीच्या स्वार्थातूनच ) वंशवादाचा जन्म झाला.या वंशवादातूनच संस्कृती जन्मास आली,आणि जातिवाद जन्मास आला.जातीवादाने पुढे चालून धर्माचे रूप घेतले,( धर्माचे घोंगडे पांघरले ). यातूनच सामाजिक विषमता निर्माण झाली.आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत,हे दाखवण्यासाठी संस्कृती जाती धर्म जन्मास आले.आणि हे वेगळेपणाचे विचार मानवजातीसाठी हानिकारक झाले,इतके की,यावरूनच संघर्ष युद्धे हिंसा सुरू झाली.ती इतकी की,मानव वंश च या पृथ्वीवर शिल्लक राहील की नाही ? अशी शंका यावी.जसे डायनासोर ची जातच नष्ट झाली,तसे तर होणार नाही ? अशी शंका विचारवंतांना सतावीत आहे.मानवतावादी विचारवंत चिंतीत आहेत.
वंशवादातून जशी जात धर्म संस्कृती जन्मास येऊन सामाजिक विषमता निर्माण झाली,तसेच दुसरीकडे वंशवादामुळेच विवाह,विवाहातून कुटुंब,कुटुंबातून घराणेशाही,घराणेशाहीतून राजेरजवाडे,त्यातून राजेशाही हुकुमशाही जन्मास आली.हुकुमशाहीतूनच देश आणि राष्ट्रांची निर्मिती,त्यामुळे सैन्य,आणि आम हिंसा जन्मास आली,यातून अणुबॉम्ब आणि यामुळे सारा निसर्गाचा विध्वंस,म्हणजे सारी जड आणि जीव सृष्टीचा विध्वंस जवळ येऊन ठेपला आहे.हे सारे परिणाम केवळ वंशवादाच्या विचारातूनच घडताहेत. हे आपणास कळल्या शिवाय आपण ” सोडनिया भेदभाव बांधा प्रेमगाठी, जगी सर्व एक आहे जात मानवाची ” शाहीर दिगू तुमवाडच्या गीतातील तत्वद्न्यान प्रमाणे वागणार नाही.
सारांश,स्वार्थ आणि मोह यातून मालकीची भावना,प्रॉपर्टी पिढ्यान् पिढ्या आपल्याच घराण्यात असावी,ती टिकविण्यासाठी सत्ता हाती असावी,हा मोह .आणि आपले वर्चस्व असल्या शिवाय लोकांना भीतीत ठेवता येणार नाही,ही महत्त्वाकांक्षा यातून अहंकार गर्व त्यातून हुकुमशाही, जाच जुलुम,अन्याय अत्याचार शोषण सुरू झाले.हे सारे अनर्थ एका वंशवाद ने केले.आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक विषमता केवळ वंशाविचाराने निर्माण झाली.



