दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पार्थदेहाला त्यांचे चिरंजीव जय पवार व पार्थ पवार यांनी चित्ताग्नि दिला आणि ते अखेर आज अनंतात विलीन झाले.
त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात झालाय.याप्रसंगी त्यांचे लाखो चाहते,आप्तेष्ट आणि गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.
काल दिनांक २८/०१/२०२६ रोज बुधवारला महाराष्ट्र राज्यातंर्गत पुणे जिल्ह्यातील बारामती येथे विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता.
आज दिनांक २९/०१/२०२६ रोज गुरुवारला त्यांच्या बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांचा अंत्यविधी शासकिय इतमामात करण्यात आला.
याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,माजी केंद्रीय गृहमंत्री तथा मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,मनसे प्रमुख राज ठाकरे,अनेक मंत्री,खासदार, आमदार,राजकीय पक्षाचे तथा सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.याचबरोबर बाहेर राज्यातील मंत्री त्यांच्या अंत्यसंस्काराला हजर होते.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेला लाखोंचा जनसागर त्यांची लोकप्रियता,त्यांचा सर्वसामान्य नागरिकांप्रती असलेला सद्वभाव,मैत्री भाव,दर्शवतो आहे.
महाराष्ट्र राज्याने विकासाभिमुख,कणखर,नेतृत्व गमावले असल्याचे अंतःकरणपुर्व दुःख राज्यातील जनतेला आहे…



