Home Social जेष्ठ पत्रकार प्रा.महेश पाणसे अलौकिक नैसर्गिक नेतृत्वच!…. — अभिष्टचिंतन व जनसेवक...

जेष्ठ पत्रकार प्रा.महेश पाणसे अलौकिक नैसर्गिक नेतृत्वच!…. — अभिष्टचिंतन व जनसेवक सन्मान सोहळ्यानिमित्त आदरभाव व्यक्त मत!…

प्रदीप रामटेके

 मुख्य संपादक

          ३ फेब्रुवारी २०२६ ला चंद्रपूर जिल्हा अंतर्गत मुल शहरात,”प्रा.महेश पाणसे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश उपाध्यक्ष,यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त,”जनसेवक सन्मान सोहळ्याचे आयोजन,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा आणि दोन्ही जिल्ह्यांतील तालुका पदाधिकाऱ्यांद्वारे करण्यात आले आहे…

            या सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे एका चालत्या बोलत्या संवेदनशील मनाच्या नेतृत्वाचे शब्दबद्ध कार्ये या सोहळ्यात उपस्थितांना ऐकविले जाणार आहे.ते कणखर नेतृत्व म्हणजेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.महेश पाणसे साहेब होत..

         प्रा.महेश पाणसे म्हणजे सखोल प्रेमाचे व खुल्या मनाच्या मैत्रीचे उगमस्थान!,”ते जातपात न पाहता त्यांच्या सान्निध्यातील सर्व पत्रकार बंधूवर,सर्व प्रकारच्या क्षेत्रातील स्नेहीवर अपार प्रेम करतात व मैत्रीद्वारे त्यांचे संरक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतात.

                याचबरोबर समान दृष्टीकोणातून कौटुंबिक परिवारातील आप्तांकडे जिव्हाळ्याने बघतात.त्यांची जिव्हाळापुर्वक कृती सर्वांना आपलेसे करणारी असतय.

           प्रा.महेश पाणसे म्हणजे दुरदृष्टीच्या कर्तव्याचे व त्यातंर्गत प्रत्यक्ष कृतीचे मार्ग आहेत.त्यांच्या पत्रकारीतेत जिवंतपणा असल्याने त्यांचे मन स्वत:सह सर्वांच्या सेवेकडे सदैव लागलेले असते.

           ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष व तदनंतर पुर्व विदर्भ अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळातील,”महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई अंतर्गत सहा जिल्ह्यातील जिल्हा शाखा,तालुका शाखांच्या बांधणीचे काम त्यांनी खुपच जिकरीने केले.

          जसे की,”सैन्य भरती करुन युद्ध जिंकायचे आहे!”होय असेच त्यांनी अनेक प्रकारची उत्तम कर्तव्ये पार पाडलीत.

          त्यांनी विविध जिल्हा व तालुका शाखांची बांधणी करतानाच,”विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे,तालुका शाखांद्वारे आयोजित विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबविले आणि विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा अशा कार्यक्रमाद्वारे सन्मान केला,सत्कार केला,त्यांना उज्वल भवितव्याची प्रेरणा दिली….

            याचबरोबर अनेक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षासाठी हेल्मेटचे वाटप केलीत.

              प्रा.महेश पाणसे हे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष असताना चिमूर क्रांती नगरीत त्यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनात जिल्हा अधिवेशन घेण्यात आले होते.तात्कालीन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष,चिमूर तालुका अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेत जिल्हा अधिवेशन यशस्वी होण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती.

                     

                   जिल्हा अधिवेशनाचे सुत्रधार व मार्गदर्शक साहाजिकच प्रा.महेश पाणसे साहेब होते.या अधिवेशनाला अनेक आजी माजी मंत्रीमहोदयांनी,माजी आमदारांनी,जगप्रसिद्ध तत्त्ववेत्ता जेमिनी कडू साहेबांनी आणि इतर मान्यवरांनी हजेरी लावली होती.

                  या जिल्हा अधिवेशनाच्या प्रसंगी विविध ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली होती व अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला होता.

                या जिल्हा अधिवेशनाला गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखांचे सर्व पदाधिकारी पत्रकार आणि प्रतिष्ठित महिला पुरुष,पदाधिकारी हजर होते.

        प्रा.महेश पाणसे सरांनी ज्या पद्धतीने जिल्हा अधिवेशन यशस्वी करण्यासाठी धडपड केली,मार्गदर्शन केले,प्रत्यक्ष सहकार्य केले.अधिवेशना दरम्यानची त्यांची धडपड,त्यांचे सहकार्य,त्यांचे मार्गदर्शन उपस्थित सर्व पत्रकार बंधुंना प्रेरणा व उर्जा देणारे ठरले होते.याचबरोबर पत्रकारांनी जनसेवा कशी करावी,याची प्रत्यक्ष कृतीतून व कर्तव्यातून उकल करुन दिली होती.

       यानंतर ते थांबले नाहीत किंवा थकले सुध्दा नाहीत.त्यांनी चंद्रपूर जिल्हा अंतर्गत जवळपास सर्वच तालुक्यात विद्यार्थ्यांना,त्यांच्या पालकांना प्रोत्साहीत करणारे व प्रेरणा देणारे कार्यक्रम तालुका शाखांद्वारे भरगच्च घेतले.

             तद्वतच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा,विविध कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सन्मान व सत्कार करणारे जिव्हाळापुर्वक कार्यक्रम घेतले.

               प्रा.महेश पाणसे साहेबांच्या मत्ते विविध कार्यालयात,विविध क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा,कर्मचाऱ्यांचा व मान्यवरांचा सन्मान व सत्कार केलाच पाहिजे आणि लोकहितासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असले पाहिजे.

           तद्वतच विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शैक्षणिक दृष्ट्या प्रोत्साहीत करण्यासाठी कार्यक्रमाची दिशा वेगवेगळ्या पध्दतीने ठरवता आली पाहिजे,अशी प्रेरणा व उर्जा त्यांनी पत्रकारांना दिली.

          “साहेबांची,अशा पध्दतीची दुरदृष्टी अंतर्गत कार्यपद्धत,अधिकारी,कर्मचाऱ्यांवर आणि समस्त नागरिकांसह विद्यार्थ्यांवर व त्यांच्या पालकांवर,”पत्रकारांना,प्रेम आणि मैत्री करायला शिकवून गेली..

              महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे तात्कालीन प्रदेशाध्यक्ष जेष्ठ संपादक वसंत मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनातंर्गत,प्रा.महेश पाणसे साहेबांच्या नेतृत्वाखाली,”कोरोना काळात पुर्व विदर्भात राबविण्यात आलेले विविध प्रकारच्या मदतीचे कार्य वाख्यांनाजोगे होते.

            मदतीच्या कार्यातंर्गत अनाज,जिवनावश्यक वस्तू,औषधे,आवश्यक साहित्य आणि इतर प्रकारचे सहकार्य पुर्व विदर्भातील जनतेला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई अंतर्गत विविध शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

           कोरोना काळात प्रा.महेश पाणसे सरांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात समस्याग्रस्त हजारो महिला-पुरुषांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली मदत अस्मरणिय अशीच आहे!…

            संकटाच्या काळात जनतेला केलेली मदत अमुल्य तर असतेच,पण ती मदत दिलासादायक असल्याने उत्तम कर्तव्याला जागरूक ठेवणारी असते.

          म्हणूनच प्रा.महेश पाणसे सरांचे अतुलनीय कार्य जमाजहितोपयोगी तर आहेच,परंतु त्यांचे कार्ये व कर्तव्ये,पत्रकारांना योग्य दिशा देणारे आहे.

          योग्य दिशा देणारा सार्थी असेल तर उत्तम कर्तव्याला व कार्याला कोणीही रोखू शकत नाही हे अतिशय मोलाचे मर्म प्रा.महेश पाणसे साहेबांनी शेकडो पत्रकारांच्या लक्षात आणून दिले‌.

           कोणीही रोखू शकत नाही,हा कानमंत्र विविध कर्तव्याला व कार्याला अनुसरून देणारे आणि त्यातंर्गत योग्य दिशा दाखविणारे प्रा.महेश पाणसे सरांसारखे पत्रकारीतेतील उत्तम मित्र,उत्तम सहकारी,योग्य मार्गदर्शक शोधूनही मिळणार नाही,याची अनेक पत्रकारांना खात्री झाली आहे.

              महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई अंतर्गत अनेक शाखांचे पदाधिकारी बनविने,त्यांना आवश्यक असे मार्गदर्शन करणे,योग्य दिशा दाखविने,विविध प्रकारचे बळ देणे,उत्तम पत्रकार घडविणे,पत्रकारांच्या मनातील भिती दूर करणे,पत्रकारांच्या मनात जनहिताबरोबर अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबतीत स्नेहभाव निर्माण करणे,असे अद्वितीय काम प्रा.महेश पाणसे सरांनी केले.

           यामुळे प्रा.महेश पाणसे साहेब केवळ तत्वज्ञ प्राध्यपक आणि जेष्ठ पत्रकारच नव्हे तर सर्वप्रथम ते मानविय अंतःकरणाचे उत्तम मानुस आहेत व सखोल ज्ञानाचे चिकित्सक समाजसेवक आहेत..

           त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले ब्रम्हपूरी येथील विदर्भ अधिवेशन,व नागपूर येथे झालेले अधिवेशन पत्रकार संघाला विशेष सकारात्मक दृष्टिकोन देणारे ठरले.

           प्रा.महेश पाणसे साहेबांच्या कार्यात व कर्तव्यात विषारी विचाराला पचविण्याची अफाट शक्ती आहे हे सुद्धा दिसून आले आहे..

             प्रा‌.महेश पाणसे साहेबांनी,विषारी विचाराला पचविण्याची अफाट शक्ती नकळत पत्रकारांना दिली आहे.त्यांच्या या विचारांना पत्रकारांनी समजून घेतले पाहिजे….

          कुठल्याही प्रकारचे शोसल व इतर प्रकारचे कार्य करताना मनाचा मोठेपणा व सावधपणा असणे आवश्यक आहे.याचबरोबर मनात सर्वांप्रती सखोल विचारांचा,प्रेमांचा,मैत्रीचा जिव्हाळा असणे गरजेचे आहे,हेच प्रा.महेश पाणसे साहेबांच्या कार्यातून व कर्तव्यातून स्पष्ट झाले.

          म्हणूनच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे राज्य उपाध्यक्ष प्रा.महेश पाणसे साहेबांचा,”अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने जनसेवक सन्मान सोहळा ३ फेब्रुवारी २०२६ ला मुल शहरात होतो आहे.

                शेकडो पत्रकारांच्या,मान्यवरांच्या आणि आमंत्रित पाहुण्यांच्या साक्षीने होणारा,”सहकुटुंब प्रा.महेश पाणसे साहेबांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने होणारा जनसेवक सन्मान सोहळा,हा डोळ्यांची पारणे फिटवणारा असणार आहे..

           म्हणूनच प्रा‌.महेश पाणसे साहेब हे कालही,आजही आणि भविष्यातील उद्याही पत्रकारांचे व विविध क्षेत्रातील स्नेहींचे मार्गदर्शनातंर्गत आधारस्तंभ असणार आहेत.

           पत्रकार हे प्रामुख्याने कलात्मक व्यक्ती असतात,म्हणजेच ते सर्जनशील आणि मूळ असतात.स्वतःला अभिव्यक्त करण्यास अनुमती देणाऱ्या वातावरणात चांगले काम करतात.याचा अर्थ असा की ते सहसा नैसर्गिक नेते व नेतृत्व असतात,जे इतरांना प्रभावित करण्यात आणि त्यांचे मन वळवण्यात यशस्वी होतात.अशाचपैकी अलौकिक नेतृत्व प्रा.महेश पाणसे सर होत….