युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा रामगांव येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी जे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा रामगांव येथे 1 ते 7 वी पर्यंत शिक्षण घेतात त्यांना शाळेचे मुख्याध्यापक डी.आर जामनिक यांच्या स्वखर्चातून विद्यार्थ्यांना सायकल वाटप करतात. हा उपक्रम जिल्हा परिषद शाळा रामगांव येथे सन 2016-17 पासून सुरु आहे.
प्रजासत्तक दिना निमित्य वर्ग 7 वी विद्यार्थी कु तेलज मिलिंद घरडे, सोहम राजेश नितनवरे, ऋशिकेस पवार, गौरव गिरी या विध्यार्थ्यांना शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवम रानडे, यांच्या हस्ते तसेच सरपंच छायाताई संजय घरडे , तेजस्वीनी अनिल घरडे उपसरपंच, सोनाली निलेश डोंगरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तसेच माजी अध्यक्ष बंडूभाऊ घरडे,माजी उपाध्यक्ष सुभाष घरडे तसेच ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम भोरखडे,संगिता चारथळ, रजनी संतोष दोडमिसे संजय घरडे, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक गोपाल वसू, गौतम घरडे, रवींद्र घरडे, संजय चारथळ, दादारावजी घरडे,आशिष घरडे, अण्णा घरडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य गण, शाळेचे मुख्याध्यापक डी आर जामनिक, तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस व गावातील इतर पालक वर्ग उपस्थिती मध्ये कार्यक्रम साजरा करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



