Home Maharashtra नाशिकचे पालक मंत्री गिरीष महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध…

नाशिकचे पालक मंत्री गिरीष महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक 

खल्लार :- काल दि. 26ला प्रजासत्ताक दिन देशात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षे 11 महीने 17 दिवस परीश्रम करूण भारतीय संविधान लिहून देशाला अर्पन केले.

          या सविधानामुळेच गिरीष महाजन नाशिकचे कुंभमेळाचे पालकमंत्री झाले.असे असून सुद्धा हेतूपरस्परपणे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतल्या गेले नाही.

           वनविभागाची महिला कर्मचारी यांनी घटनेचा जाहीर निषेध केला. त्याच घटनेचा वंचित बहुजन आघाडी दर्यापूर तालुक्याच्या वतीने माजी अध्यक्ष या नात्याने जाहीर निषेध करतो असे वंचितचे माजी तालुकाध्यक्ष भिमराव कुऱ्हाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.