Home Social मौजा चिचाळा (कुणबी) येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…

मौजा चिचाळा (कुणबी) येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…

शुभम गजभिये

विशेष प्रतिनिधी.

      चिमूर तालुक्यातील मौजा चिंचाळा (कुणबी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

        ध्वजारोहण झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.याचबरोबर प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथमच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रम अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.

         सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळा समितीचे अध्यक्ष श्री.दिलीप राऊत,ग्रामपंचायत सरपंच सौ.मनीषा प्रकाश ढोरे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री.किशोर सर्जेराव चौधरी,तसेच चिंचाळा कुणबी येथील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

         कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन व अंमलबजावणीसाठी शाळेच्या शिक्षिका फटिंग मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व परिश्रम घेतले.

        या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत,नृत्य,नाट्य व विविध सांस्कृतिक उपक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. 

         विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाल्याने कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व आयोजक,शिक्षकवर्ग,विद्यार्थी व सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.