Home Social ग्रामगीता महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन “युवास्पंदन-2026” संपन्न…

ग्रामगीता महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन “युवास्पंदन-2026” संपन्न…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

       ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे दिनांक 20,21 व 22 जानेवारी 2026 ला वार्षिक स्नेहसंमेलन “युवा स्पंदन-2025-26” चे आयोजन करण्यात आले होते. 

        दिनांक 21 जानेवारी 2026 ला सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष,महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ.सुनंदा आस्वले व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रोशनीताई वडेट्टीवार संचालक सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण मंडळ गडचिरोली,प्रा. डॉ.शशिकांत आस्वले निवृत्त वित्त व लेखाधिकारी संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती,प्रा.डॉ.संदीप सातव संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग,प्रा.डॉ.निलेश ठवकर न्याक समन्वयक,प्रा.डॉ. प्रणाली टेंभुर्णे सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मंचावर उपस्थित होते. 

         महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ.सुनंदा आस्वले यांच्याकडून रोशनीताई वडेट्टीवार व प्रा.डॉ.शशिकांत आस्वले यांचा शाल,श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

          पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना संबोधित केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

         या कार्यक्रमाचे संचालन प्रा.कु.प्रज्ञा खोबरागडे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.डॉ.प्रणाली टेंभुर्णे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.कु.स्नेहाली बांबोडे यांनी मानले.

        त्यानंतर दिनांक 22 जानेवारीला समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष,महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.सुनंदा आस्वले व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.गणपत देशमुख प्राचार्य महात्मा गांधी महाविद्यालय नागभीड,डॉ. संदीप सातव,प्रा.डॉ.निलेश ठवकर,प्रा.डॉ.सुमेध वावरे,प्रा. डॉ.प्रणाली टेंभुर्णे,प्रा.मेहमूद पठाण हे मंचावर उपस्थित होते.

          गेल्या तीन दिवसापासून विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्यामध्ये कबड्डी,क्रिकेट, व्हॉलीबॉल, दौड,लगोरी,कोलाज, रांगोळी, मेहंदी,गीत गायन व नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. 

         समरोपीय कार्यक्रमांमध्ये डॉ.गणपत देशमुख यांनी विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना व त्यांच्यामधील असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळत असतो व त्यांचा आत्मविश्वास हा वाढत असतो,असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणातून संबोधित केले.

         तसेच प्रा.डॉ.संदीप सातव,यांनी शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी 2024-25 मध्ये प्राविण्य मिळविले त्यांचा अहवाल वाचून दाखविला व पाहुण्यांच्या हस्ते कलर कोट व चषक देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

         तसेच या समारोपीय कार्यक्रमांमध्ये क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा अहवाल वाचन प्रा.प्रणिता मानापुरे यांनी वाचून दाखविला.

           प्रा.मेहमूद पठाण व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुनंदा आस्वले यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनंदा आस्वले व प्रमुख पाहुणे,डॉ.गणपत देशमुख यांच्याकडून सर्व स्पर्धेमधील विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व चषक देऊन,पुढील वाटचाली करीता विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

           त्याचप्रमाणे विद्यार्थी विकास विभाग,गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली तर्फे आयोजित “युवा महोत्सव -भरारी 2024-25″मधील विजयी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे चषक देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

            समारोपीय कार्यक्रमाचे संचालन,प्रा.श्रद्धा डोईजाड,प्रास्ताविक प्रा.सरताज शेख व आभार प्रदर्शन प्रा.प्रज्ञा खोब्रारागडे यांनी केले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.