दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ तसेच संबंधित नियमांनुसार आळंदी नगरपरिषदेच्या विषय समित्या व स्थायी समितीचे गठन आज (दि. २३) विशेष सभेत बिनविरोध करण्यात आले. विषय समित्यांच्या गठनानंतर स्थायी समितीची रचना जाहीर करण्यात आली.
यामध्ये प्रशांत पोपट कुन्हाडे यांची स्थायी अध्यक्षतेखाली समितीचे सभापती तसेच आळंदी नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती वत्याच उपाध्यक्षा म्हणून सुजाता तापकीर यांचीसमिती त्या निवड झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी साक्षी अक्षय कुऱ्हाडे, शालेय शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी खुशी सागर बोरुंदिया, मागासवर्गीय कल्याणकारी व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी वैजयंता अशोक उमरगेकर, यात्रा, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी पूजा संजय घुंडरे, महिला व बालकल्याण व वैद्यक समितीच्या सभापतीपदी ऋतुजा अनिकेत तापकीर, तर महिला व बालकल्याण व वैद्यक समितीच्या उपसभापतीपदी कांचन किरण येळवंडे यांची निवड करण्यात आली.
दरम्यान शिवसेनेचे नगरसेवक आदित्य घुंडरे यांची नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सदर विषय समित्या व स्थायी समितीचा कार्यकाळ दि. २३ जानेवारी २०२६ पासून एक वर्षासाठी राहणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली.
विषय समित्या व स्थायी समितीचे सभापती व सदस्य बिनविरोध निवडून आल्याबद्दल पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले.



