Home शैक्षणिक कु.इशीका निळकंठराव धोटे या विद्यार्थीनीला दोन सुवर्ण पदके… — गोंडवाना विद्यापीठातंर्गत...

कु.इशीका निळकंठराव धोटे या विद्यार्थीनीला दोन सुवर्ण पदके… — गोंडवाना विद्यापीठातंर्गत एम.एस्सी प्राणीशास्त्र या पदव्युत्तर अभ्यासक्रमात उल्लेखनीय यश..

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

         गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली येथे पार पडलेल्या १३ व्या दीक्षांत समारंभात चिमुर क्रांतिभूमीची कन्या कु.इशिका नीलकंठराव धोटे हिने एम.एस्सी.प्राणीशास्त्र (Zoology) या पदव्युत्तर अभ्यासक्रमात उल्लेखनीय यश संपादन करत दोन सुवर्णपदके पटकावली.

        (कै.सुखदेवराव रा.बाकरे यांचे स्मृतीनिमित्त सुवर्णपदक,स्व.डॉ. वैभव वसंतराव दोंतुलवार, बल्लारपूर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुवर्णपदक प्राप्त केलेले आहे.).

          तिने आपले शिक्षण आनंद निकेतन महाविद्यालय,आनंदवन,वरोरा येथून पूर्ण केले आहे.

          कु.इशिका ही अत्यंत मेहनती,अभ्यासू,सक्रिय व ध्येयवेडी विद्यार्थिनी असून तिच्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे हे यश शक्य झाले आहे. 

        तिच्या या यशामुळे प्राध्यापक,पालक व संपूर्ण कुटुंबीयांना विशेष आनंद व अभिमान वाटत आहे.हा क्षण शिक्षक व पालकांसाठी अत्यंत भावनिक व गौरवास्पद ठरला.

       कु.इशिका हिच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी संपूर्ण कुटुंबीयांचे आशीर्वाद सदैव तिच्या पाठीशी असून भविष्यातही ती अशीच यशाची नवनवी शिखरे सर करोत,अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

         इशीका क्रांतीभुमी चिमूरची रहिवासी असून तिने गुरजन,मार्गदर्शक,आईवडील, मित्रांना श्रेय दिले.तिच्या यशाबद्दल परिसरात शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.