Home शैक्षणिक नवजीवनच्या इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांची बाजीराव करंजेकर फार्मसी कॉलेजच्या आयुर्वेदिक बोटॅनिकल गार्डनला...

नवजीवनच्या इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांची बाजीराव करंजेकर फार्मसी कॉलेजच्या आयुर्वेदिक बोटॅनिकल गार्डनला शैक्षणिक क्षेत्रभेट…

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक 

जमनापूर :- साकोली येथील नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (सीबीएसई) च्या इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच बाजीराव करंजेकर फार्मसी कॉलेज, साकोली येथील आयुर्वेदिक बोटॅनिकल गार्डनला शैक्षणिक क्षेत्रभेट दिली.ही क्षेत्रभेट शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्राचार्या भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे व पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.

            या क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना औषधी व आयुर्वेदिक वनस्पतींची ओळख, त्यांचे औषधी गुणधर्म, उपयोग तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देणे हा होता. बोटॅनिकल गार्डनमध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पती पाहून विद्यार्थ्यांनी त्याबाबत उत्सुकतेने माहिती जाणून घेतली.

         कॉलेजमधील डॉ.आतिश सहारे, चित्रांगना रामटेके व तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना वनस्पतींचे वैज्ञानिक व आयुर्वेदिक महत्त्व, त्यांचा दैनंदिन जीवनातील उपयोग तसेच निसर्ग संवर्धनाची आवश्यकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे विज्ञान विषयातील ज्ञान अधिक दृढ झाले.

          क्षेत्रभेटीत शिक्षकवर्ग उपस्थित होता. विद्यार्थ्यांनी ही भेट ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.