प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
बसपा व वंचितच्या नगरसेवक आणि नगरसेविकांची महानगरपालिकेत एंट्री सत्य,पारदर्शक व वास्तविक कार्याला आणि कर्तव्याला बळ देणारी ठरेल असे गृहीत धरायला हरकत नाही.तद्वतच बसपा व वंचितच्या नगरसेवक आणि नगरसेविकांच्या एंट्रीने महानगरपालिकेतील धक्कादायक व योग्य निर्णय,नियोजन हे जनतेपर्यंत पोहचणार आहेत.
यामुळे महाराष्ट्र सरकारचे आणि महानगरपालिकांचे निर्णय व नियोजन हे जनतेच्या हितासाठी,विकासासाठी आणि संरक्षणासाठी आहेत काय?,कि विरोधातले आहेत हे तडकाफडकी कळणार आहेत.
विशेषतः केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या पायाभूत सुविधांचे व विकासाचे धोरण,हे कशाप्रकारे अंमलात आणले जाते,नागरिकांच्या मुलभूत अधिकारांना कसे डावलले जाते,भांडवलदारचे हित कसे जपले जाते,शिक्षणा व आरोग्य संबंधातील धोरणे काय?नागरिकांच्या सनदला महत्व दिले जाते काय? स्वच्छता व पाणी समस्या कशाप्रकारे हाताळली जाते,महानगरपालिका पालिका अंतर्गत आरक्षित जागेचे आवंटन कशाप्रकारे केली जातात,पट्टे कशाप्रकारे दिली जातात याबाबत सर्व माहिती बसपा व वंचितच्या नगरसेवक आणि नगरसेविकांच्या माध्यमातून जनतेसमोर येणार आहेत.
म्हणूनच बसपा व वंचितच्या नगरसेवक आणि नगरसेविकांची अनेक नगरपालिकेतील एंट्री अतिशय महत्वाची व दखलपात्र आहे असे म्हणावे लागेल.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि बसपाचे उमेदवार हे कुठून किती निवडून आले याबाबत अजुनपर्यंत आकडे पुर्ण आलेली नाहीत.
पण,बसपाचे नगरसेवक चंद्रपूर,अहिल्याबाईनगर,अमरावती,मुंबई,ठाणे,नागपूर येथे निवडून आले असल्याचे कळले आहे,तर वंचितचे नगरसेवक मुंबई,औरंगाबाद,नांदेड,लातूर,चंद्रपूर,उल्हासनगर,सोलापूर,आणि इतर ठिकाणी निवडून आले असल्याचे कळले आहे.
भरमसाठ रुपयांना टक्कर देत बसपा व वंचितचे निवडून आलेले नगरसेवक व नगरसेविका हे वंचित,शोषीत,अन्यायग्रस्त,सत्ताविहिन,नागरिकांचे बळ असल्याने सहाजिकच आहे,नवी उमेद या नागरिकात जागी होणार असे म्हणावेच लागले.
वंचित तथा बहुजन समाज पार्टीच्या नगरसेवक व नगरसेविकांना सर्व प्रकारचा समाज आस्थेने आदर करतोय हिच या दोन्ही पक्षाची मोठी उपलब्धी आहे…



