Home Social ‘विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर कार्यशाळा संपन्न…

‘विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर कार्यशाळा संपन्न…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक 

खल्लार :- छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे इतिहास विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय मानसिक आरोग्य कार्यशाळा संपन्न झाली.

             या कार्यशाळेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अजिक्य कराळे यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. आताच्या सामाजिक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यावर मानसिक ताण दिवसेंदिवस वाढत आहे.त्याचा परिणाम हा अभ्यासावर होऊन विद्यार्थी चुकीचा निर्णय घेऊन बरेचशे विद्यार्थी आत्महत्ये कडे वळतात त्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य ते मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मराठी विभागाचे प्रा.अतुल चऱ्हातें व प्रा.सागर भुसारी उपस्थित होते.

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र इचे उपस्थित होते. संचालन इतिहास विभागाचा विद्यार्थी सॅम्युअल गवई यांनी केले. तर आभार प्रणाली कौतिकर यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभागप्रमुख डॉ. प्रविण सदार यांनी केले होते.