रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर नगर परिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा म्हणून गिता लिंगायत यांनी दिनांक ०९ जाने.रोजी अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला. उपाध्यक्षपदी संजय नवघडे याची सर्वानुमते निवड करून त्याचा ही पदग्रहण सोहळा पार पडला. चिमूर नगर परिषद येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात आयोजित पदग्रहण समारंभ अत्यंत सुसंस्कृत व उत्साही वातावरणात पार पडला.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी नवनियुक्त नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांना सन्मानाने खुर्चीवर विराजमान केले. या समारंभास आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची विशेष उपस्थिती होती आमदार महोदयांनी अध्यक्षेस्थान भुषवले.
पदग्रहण समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार महोदयांनी नवनियुक्त नगराध्यक्षा तथा उपाध्यक्ष यांचे समेत नगरसेवक नगरसेविका यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चिमूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करावे, तसेच शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वीज, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहराच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरणारे कार्य घडावे,अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष तथा सर्व नगरसेवक-नगरसेविका व प्रशासन यांनी राष्ट्रसंतांच्या विचारावार कार्य करण्याचे आवाहन करित यावेळी चिमुरकराचे आभार मानले.
नवनियुक्त लिंगायत मँडम यांनी आपल्या मनोगतात पदग्रहणा बद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवक, प्रशासन, अधिकारी वर्ग तसेच नागरिकांना विश्वासात घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख कारभार केला जाईल. शहराच्या प्रगतीसाठी कायदेशीर चौकटीत राहून ठोस व दीर्घकालीन विकासकामे राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी समोचीत मान्यवरांनी सबोधित केले. तसेच चिमुर नगर परिषदेच्या स्विकूत सदस्य पदी सचिन फरकाडे व श्रेयस लाखे याची निवड करण्यात आली.
या समारंभास आमदार बंटीभाऊ भांगडिया, माजी राज्यमंत्री डॉ. रमेशजी गजबे ,भाजपा राज्य परिषदेचे सदस्य राजु देवतळे , घनश्याम डुकरे, राजु झाडे, गजानन गुळधे समिर राचलवार ,भाजपा जेष्ट नेते निलिम राचलवार , भिसीचे नगराध्यक्ष अतुल पारवे , भाजपा जेष्ठ नेते डॉ. दिपक यावले, भिमराव ठावरी , कमल असावा, सुधिर पोहणकर, बंटी वनकर, प्रकाश असावा, बाळू पिसे, माया नन्नावरे आदी अन्य मान्यवर पदाधिकारी तथा पक्षाचे विद्यमान नगरसेवक, तथा अन्य नगरसेवक -सेविका, भाजपा पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



