Home देशविदेश पोलिसांची निष्क्रियताच अवैध धंद्याना चालना देतय?… — भाग – ०१….

पोलिसांची निष्क्रियताच अवैध धंद्याना चालना देतय?… — भाग – ०१….

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

          दारु,जुगार,सटामटका, यांसारख्या अवैध व्यवसायाच्या विळख्यात समाज अडकला असून,विळख्यात अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्याचे काम पोलिस विभागाचे आहे.पण पोलिस विभागाची निष्क्रियताच अवैध धंद्याना चालना देत असल्याने,अवैध धंदे बंद तरी कसे होणार? हा महत्त्वाचा मुद्दा पोलिस विभागाबाबत अधिकच गंभीरता निर्माण करतो आहे..

           सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास,”अवैध धंदे म्हणजे वैध नसलेले धंदे.जे धंदे वैध नाही ते धंदे पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे बिनधास्त सुरू आहेत असे म्हणावेच लागले.

       तद्वतच जे अवैध व्यवसाय गल्लीबोळ्यात सुरू आहेत ते कुणाच्या छत्रछायेखाली? आणि अवैध धंद्याना जबाबदार कोण? हे कायदेशीररीत्या पोलिस विभागांनी पुढे आणायला हवे या मताची जनता आहे.

       मटका हा जुगाराचा एक प्रकार आहे.मटका जुगार किंवा सट्टा हा सट्टेबाजी आणि लॉटरीचा एक प्रकार आहे.सध्या “आकड्यांचा जुगार” म्हणून ओळखला जातोय. 

        अवैध धंद्यांचा सुळसुळाट” म्हणजे बेकायदेशीर व्यवसाय.दारूविक्री,जुगार,मटका,आणि इतर गैरकृत्ये समाजात मोठ्या प्रमाणावर वाढणे,ज्यामुळे गुन्हेगारी वाढते आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.

            यामुळे पोलीस प्रशासनावर दबाव येतो आणि काहीवेळा त्यांच्या निष्क्रियतेमुळे किंवा हप्तेखोरीमुळे हे धंदे अधिक जोमात चालतात.ज्यामुळे समाजातील तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळते आणि गुन्हेगारीकडे आकर्षित होते,अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आढळते. 

           अवैध धंद्यांचे स्वरूप म्हणजे सट्टा व्यवसायांची अड्डे व जुगारांची अड्डे ठिकठिकाणी सुरू असणे होय व देशी-विदेशी दारू,गावठी दारू आणि ताडीची अवैध विक्री मोठ्या प्रमाणावर होणे होय.

          तद्वतच इतर नशा करणाऱ्या पदार्थांची अवैध विक्री आणि मानव तस्करी यांसारखे गंभीर गुन्हे देखील यात समाविष्ट आहेत.कारण तरुणांमध्ये लवकर श्रीमंत होण्याची इच्छा अवैध धंद्यांकडे आकर्षित करते.

         काही ठिकाणी पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष किंवा हप्तेखोरीमुळे हे धंदे थांबत नाहीत.अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढते आणि गुन्हेगारी टोळ्या तयार होतात.व्यसनाधीनता आणि कर्जबाजारीपणा यामुळे अनेक कुटुंबे अडचणीत येतात. 

            पोलीस प्रशासनाने सक्रिय होऊन अशा धंद्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.अवैध धंद्यांचे दुष्परिणाम हे समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचले असून विनाशाकडे करोडो नागरिक वळलेले आहेत.

          अवैध धंद्यांचा सुळसुळाट म्हणजे समाजात पसरलेली एक गंभीर समस्या आहे,ज्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांच्या सहभागाचीही गरज आहे.

           अवैध धंद्यांची वाढ ही कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवण्याच्या इच्छेमुळे होत आहे,ज्यात दारू विक्री,मटका,जुगार,गांजा,गुटखा,अमली पदार्थ आणि बनावट उत्पादने यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. 

          याला पोलिसांचे दुर्लक्ष आणि काही ठिकाणी राजकीय पाठबळ कारणीभूत ठरत आहे,ज्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढून गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत आहे.

          तरुणाईला लवकर श्रीमंत होण्याची इच्छा असल्याने ते या धंद्यांकडे आकर्षित होत आहेत.अनेक ठिकाणी पोलिसांकडून अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे किंवा त्यांना संरक्षण दिले जात आहे, अशी चर्चा आहे.

         काही ठिकाणी अवैध धंदे करणाऱ्यांना राजकीय नेत्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे,ज्यामुळे कारवाई होत नाही.

         याचबरोबर बेरोजगारीमुळे अनेक तरुण या अवैध कामांमध्ये ओढले जात आहेत.अवैध हातभट्ट्या,बनावट दारू आणि गावठी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे.तद्वतच सट्टा पट्टी,जुगार आणि मटका यांसारखे खेळ सर्रास सुरू आहेत.गांजा,चरस आणि इतर अमली पदार्थांची तस्करी व विक्री वाढली आहे.

         तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे आणि ते गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील होत आहेत.यामुळे समाजात अशांतता,मारामारी,चोरी आणि इतर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे.भेसळयुक्त दारुमुळे व ताडीसारख्या पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 कठोर कारवाई…

      पोलिसांना अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश शासनस्तरावरुन देण्यात आले आहेत.परंतू पोलिस अवैध धंदेवाईकांना व्यवसाय करण्यास मोकळीकता देत असल्याने अवैध व्यवसायीक मस्तावले आहेत आणि पोलिसांचे अप्रत्यक्ष मित्र बनले आहेत.

          विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची गरज आहे.

          अवैध म्हणजे जे कायदेशीर,अधिकृत,किंवा योग्य नाही,जे नियमांच्या,कायद्याच्या,किंवा तर्काच्या विरुद्ध आहे किंवा ज्याला कोणताही कायदेशीर किंवा नैतिक आधार नाही अशा गोष्टीला अवैध म्हणतात.जे कायद्याच्या कक्षेत येत नाही किंवा कायद्याने प्रतिबंधित आहे.जे नैतिकदृष्ट्या योग्य नाही किंवा चुकीचे आहे.

            अवैध व्यवसाय हे कायदेशीर दृष्ट्या अयोग्य कार्यपद्धतीमध्ये येत असल्यामुळे अशा व्यवसायांवर पोलिस विभागांनी नियंत्रण आणले पाहिजे आणि अवैध व्यवसायीकांवर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे या मताची जनता आहे.