Home कृषी सन २०२५-२६ खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर…

सन २०२५-२६ खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर…

ऋषी सहारे 

   संपादक 

गडचिरोली : खरीप पिकाची अंतिम पैसेवारी तहसिलदार यांचेकडून प्राप्त माहितीचे आधारे संकलीत करुन गडचिरोली जिल्ह्याची सन २०२५-२०२६ या वर्षाची खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येत आहे.

        गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६८९ गावे असून खरीप पिकाची गावे १५५५ आहेत. व एकूण पिका खालील क्षेत्राच्या २/३ क्षेत्रामध्ये खरीप पिकाची पेरणी केलेल्या रब्बी गावांची संख्या ०४ आहेत. त्यापैकी खरीप गावामध्ये पीके नसलेली गांवे ५३ आहेत. सदर खरीप पिक असलेल्या गावांपैकी ५० पैशाचे आत पैसेवारी असलेले ० असून ५० पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकूण खरीप पिक असलेल्या गावांची संख्या १५०६ आहेत. अशा प्रकारे एकूण १५०६ खरीप पिक असलेल्या गावाची पैसेवारी जाहीर केलेली आहे.

          गडचिरोली जिल्ह्याची खरीप हंगाम २०२५-२०२६ या वर्षाची अंतिम पैसेवारी ही ०.७७ आहे. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.