Home कृषी शेतकऱ्यांनी शेंद्रीय खताचा वापर करून पिके घ्यावी :-पुलकीतसिंग… — सावली येथे...

शेतकऱ्यांनी शेंद्रीय खताचा वापर करून पिके घ्यावी :-पुलकीतसिंग… — सावली येथे शेतकरी मेळावा तथा प्रगतशील सन्मान सोहळा…

     सुधाकर दुधे 

सावली तालुका प्रतिनिधी 

सावली :- रासायनिक खतामुळे जमिनीची सुपीकता कायमस्वरूपी टिकून राहत नाही.त्यामुळे जमिनीचा पोत बिघडते.पिकांची जोमाने वाढ होत नाही.उत्पादनात घट येते.जमिनीची सुपीकता तयार व्हायला अनेक वर्षे लागतात.शेंद्रीय खताने सुपीकता वाढून पिकाच्या उत्पादनात वाढ होते.त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑर्गनाईक शेती करावी असे प्रतिपादन पुलकीतसिंग मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन दिवसीय सुरू असलेल्या कृषी मेळाव्या प्रसंगी उपस्थिती दर्शवून बोलत होते.

         येथील विश्वशांती विद्यालयांच्या भव्य पटांगणात लोकनेते वामनराव गड्डमवार यांच्या जयंती निमित्ताने आयोजित शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शितचा कार्यक्रमात ते बोलत होते.

           यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुनिल बल्लमवार, कार्यक्रमाच्या मंचावर पुलकीतसिंग मुख्य कार्यकारीअधिकारी, मुक्तेश्वर कोमलवार गटविकासअधिकारी, संदीप गड्डमवार, राजबाळ संगीडवार ,उपाध्यक्ष अनिल स्वामी नरेश सुरमवार, विजय कोरेवार,सुशील नरेड्डीवार, नितीन गोहणे, संजय गड्डमवार,सुनील नरेड्डीवार आदिचीयांनी उपस्थिती दर्शवली होती.

            तसेच पुलकीतसिंग यांच्या हस्ते प्रगतिशील शेतकरी संजय तुळशीराम मडावी रा. चकपिरंजी,रुमजी गिरमाजी भोयर, रा.कवटी, देविदास सुरेश चौधरी रा.साखरी यांचा सत्कारकरण्यातआला.पुढे बोलताना ते म्हणाले की शेती करतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे.त्यामुळे उत्पादनात वाढ नक्कीच होईल.हा शेतकरी मेळावा त्यासाठीच घेण्यात आला आहे.

          हंगामानुसार पिकांचा आराखडा तयार करा. हिरवळीचे पिके घ्या. हिरवळीच्या पिके फुलोऱ्यावर असतांना नांगरटी करून जमिनीत गाडावी.त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. रासायनिक खतांचा वापर कमी करावा.त्यामुळे दुष्परिणाम पिकावर दिसून येतात.अधिक उत्पादन वाढीसाठी शेंद्रीय खताची गरज महत्त्वाची असते.शेतकऱ्यांनी कृषी विषयावर मार्गदर्शन करणाऱ्या कृषी तज्ञाशी नेहमी संपर्कात राहावे असे मार्गदर्शन करण्यात आले.