Home देशविदेश एकलव्य ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत जि.प.शाळेचे सुयश…

एकलव्य ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत जि.प.शाळेचे सुयश…

ऋग्वेद येवले

 उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली :- सन २०२५ मध्ये बहुउद्देशीय ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षा नागपूर द्वारा घेण्यात आलेली होती. एकलव्य ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत गणेश वॉर्ड स्थित जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा साकोली क्रमांक १ येथील विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्राप्त केले.

          तालुक्यात फिनिक्स भरारी घेणारी ही शाळा दिवसेंदिवस आपल्या यशाचा तुरा खोचत असून शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थीसुद्धा आता या शाळेचा मान उंचावू लागलेले आहेत. या शाळेत सध्या तरी मुख्याध्यापक डी.डी. वलथरे यांच्या नेतृत्वात या शाळेने जिल्हास्तरावर नावलौकिक उंचावलेले आहे.

           एकलव्य ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत वर्ग ७ मधील धनश्री अजय कापगते, वर्ग ६ मधील मोहिनी विष्णू मेश्राम आणि वर्ग ५ मधील प्रकृती रवि भोंगाने या ३ विद्यार्थिनींनी या परीक्षेत भरघोश यश संपादन करून शाळेचे आणि शिक्षक, शिक्षिका वृंदांचे नावलौकिक केलेले आहे. सदर विद्यार्थिनींचा कौतुक सत्कार सोहळा आगामी काळात होणाऱ्या शाळेतील स्नेहसंमेलनात होणार आहे.

         शाळेचे नावलौकिक करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक डी.डी. वलथरे, शिक्षक वृंद मोरेश्वर बोकडे, तुलसीदास पटले, पदवीधर शिक्षक चेतन बोरकर, शिक्षिका वृंद शालिनी राऊत, चित्रलेखा इंगळे, श्रद्धा ओटी, आरती कापगते, पोषण आहार सहकारी रेश्मा कोवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत भारद्वाज आणि समस्त शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केलेले आहे.